जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Electric Vehicles वर किती विश्वास ठेवायचा? पाहा काय सांगतो अभ्यास

Electric Vehicles वर किती विश्वास ठेवायचा? पाहा काय सांगतो अभ्यास

Electric Vehicles वर किती विश्वास ठेवायचा? पाहा काय सांगतो अभ्यास

जागतिक बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicles) लोकप्रियता वेगाने वाढत आहे. पेट्रोल-डिझेलसारख्या पारंपरिक इंधनाचं मूल्य (Fossil Fuels) सातत्याने वाढत आहे. या वाहनांमधून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनामुळे (Carbon Emission) वायूप्रदूषण, जागतिक तापमानवाढ (Global Warming) आदी समस्यांच्या तीव्रतेत वाढ होत असून, त्याबद्दलची जागरूकताही वाढत आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 12 डिसेंबर : जागतिक बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicles) लोकप्रियता वेगाने वाढत आहे. पेट्रोल-डिझेलसारख्या पारंपरिक इंधनाचं मूल्य (Fossil Fuels) सातत्याने वाढत आहे. या वाहनांमधून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनामुळे (Carbon Emission) वायूप्रदूषण, जागतिक तापमानवाढ (Global Warming) आदी समस्यांच्या तीव्रतेत वाढ होत असून, त्याबद्दलची जागरूकताही वाढत आहे. विविध सरकारांकडूनही इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत वाढ होत आहे; मात्र असं असलं तरीही अनेक जणांना पारंपरिक इंधनांच्या वाहनांकडून इलेक्ट्रिक वाहनांकडे शिफ्ट होण्याबद्दल अनेक शंका आहेत. त्यातच अलीकडे झालेल्या एका अभ्यासाच्या अहवालातून असं समोर आलं आहे, की ई-कार्स फारशा विश्वासार्ह नसतात. त्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. या अभ्यासात असं म्हटलं आहे, की इलेक्ट्रिक कारमधली गुंतागुंत सातत्याने वाढत चालली आहे. त्यामुळे त्यावर किती विसंबून राहायचं याबद्दलच्या शंका कायम राहतील. ई-वाहनांसाठी वापरलं जाणारं तंत्रज्ञान सातत्याने आधुनिक होत चाललं आहे. त्यातल्या बारीकसारीक गोष्टींचे तपशील फक्त पूर्णतः प्रशिक्षित व्यक्तीलाच कळू शकतात. आधुनिक इलेक्ट्रिक वाहनांमध्ये कॉम्प्लेक्स इन्फोटेन्मेंट आणि टेक्नॉलॉजी फीचर्स दिली जातात. विश्लेषणातून असं समोर आलं आहे, की लक्झरी इलेक्ट्रिक कारवर (Luxury Electric Cars) जास्त भरवसा ठेवता येत नाही. दुसऱ्या बाजूला, स्वस्त इलेक्ट्रिक वाहनं जुन्या तंत्रज्ञानावर आधारित असतात. या विश्लेषणात दिलेल्या माहितीनुसार, निस्सान लीफ इलेक्ट्रिक व्हेइकल (Nissan Leaf Electric Vehicle) अनेक आधुनिक इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत उत्तम परफॉर्मन्स देते. या अहवालात असं सांगण्यात आलं आहे, की टेस्ला (Tesla) हा ब्रँड विश्वासार्हतेच्या रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. टेस्लाच्या वाय मॉडेलची विश्वासार्हता खूपच कमी आहे. टेस्लाच्या मॉडेल-3मध्ये अनेक समस्या आहेत. असं असलं तरीही या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे, की चीनमध्ये तयार झालेल्या टेस्ला कार त्यासारख्याच अमेरिकेत तयार झालेल्या वाहनांच्या तुलनेत खूप चांगल्या आहेत. या विश्लेषणात म्हटल्यानुसार, इलेक्ट्रिक कारवर भरवसा योग्य आहे; मात्र त्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असल्याने अनेक समस्या उत्पन्न होत आहेत. विश्वासार्ह इलेक्ट्रिक कारच्या बाबतीत लेक्स, माझदा आणि टोयोटा हे ब्रँड्स आघाडीवर आहेत. या तिन्ही कार उत्पादक कंपन्या अनेक हायब्रिड वाहनांची निर्मिती करतात आणि इलेक्ट्रिक कारच्या विश्वामध्ये त्यांची वेगळी ओळख आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे इलेक्ट्रिक प्रकार वापरू इच्छिणाऱ्यांची संख्या मोठी आहे; मात्र अद्याप त्यांच्या किमती जास्त असल्यामुळे सर्वसामान्य माणसं तिकडे वळलेली नाहीत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात