मुंबई, 26 नोव्हेंबर: मोबाइलधारकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध मोबाइल कंपन्यांकडून बऱ्याच ऑफर्स जाहीर केल्या जातात. यात कॉलिंग, मेसेजिंग, इंटरनेट डेटाची सुविधा दिली जाते. जिओ कंपनीने आणलेल्या पोस्ट पेड प्लॅनची सध्या बरीच चर्चा होताना पाहायला मिळते. यात अनलिमिटेड कॉलिंगसह नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइमचं सबस्क्रिप्शनही मिळत असल्याने ओटीटीवरच्या ‘शो’जचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे.
जिओ कंपनीच्या अनेक प्रीपेड प्लॅन्समध्ये ग्राहकांना चांगल्या ऑफर्स दिल्या जातात. मोबाइल ग्राहकांच्या बजेटमध्ये त्यांना अधिकाधिक लाभ देण्याचा नेहमीच प्रयत्न असतो. दर महिन्याला रिचार्ज करण्याच्या त्रासातून वाचायचं असेल तर ग्राहक पोस्टपेड प्लॅनची निवडही करू शकतात. युझर्ससाठी जिओचे अनेक पोस्टपेड प्लॅन्स आहेत. सध्या एका पोस्टपेड प्लॅनची जोरदार चर्चा होत आहे. हा प्लॅन मासिक 399 रुपयांत मिळू शकतो. या प्लॅनअंतर्गत देशभरामध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. याशिवाय 75 जीबी डेटाही दिला जातोय. इंटरनेटचा वापर तितक्या प्रमाणात होत नसेल तर 200 जीबी डेटा रोलओव्हर ऑफरही दिली गेलीय.
हेही वाचा:
ओटीटीवर शोज पाहण्यासाठी प्लॅन उत्तम-
प्लॅनमध्ये अनेक प्रकारचे लाभ दिले जात आहेत. जिओ कंपनीच्या वतीने सर्वांत स्वस्त पोस्टपेड प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइमचं सबस्क्रिप्शन अगदी मोफत दिलं गेलं आहे. या प्लॅनमध्ये मिळणारे फायदे घ्यायचे असतील, तर आपण प्रीपेडमधून पोस्टपेड प्लॅनमध्ये स्विच होऊ शकता. हा प्लॅन खूप उपयोगी होऊ शकतो. हा प्लॅन निवडल्यास पैसे पुरेपूर वसूल होऊ शकतात.
दर वेळी डेटा रिचार्ज करण्याची गरज नाही-
प्रीपेड प्लॅनऐवजी पोस्टपेड सेवा घेतल्यास दर वेळी डेटा रिचार्ज करण्याची आवश्यकता भासत नाही. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा नेटफ्लिक्स व अॅमेझॉन प्राइम या ओटीटीवरचे विविध शोज आणि सिनेमाचा आनंद घेतो तेव्हा मोबाइलचा डेटा मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो. पोस्टपेड प्लॅन असेल तर ओटीटीवरचे विविध सिनेमे, शोज, डॉक्युमेंटरी आदी गोष्टी पाहण्याचा मनसोक्त आनंद घेता येऊ शकतो. त्यामुळे पोस्टपेड प्लॅनसाठी ठरावीक रक्कम खर्च करून इंटरनेट, ओटीटीवरच्या शोजचा मनसोक्त आनंद घेता येऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Reliance Jio, Relince jio