मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Jioची धमाकेदार ऑफर! युजर्सना देत आहे 10 लाख रुपयांची गिफ्ट, वाचा डिटेल्स

Jioची धमाकेदार ऑफर! युजर्सना देत आहे 10 लाख रुपयांची गिफ्ट, वाचा डिटेल्स

Jioची धमाकेदार ऑफर! युजर्सना देत आहे 10 लाख रुपयांची गिफ्ट, वाचा डिटेल्स

Jioची धमाकेदार ऑफर! युजर्सना देत आहे 10 लाख रुपयांची गिफ्ट, वाचा डिटेल्स

Jio 6th Anniversary offer: जिओची ही खास अ‍ॅनिव्हर्सरी ऑफर 6 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर 2022 पर्यंत वैध आहे. या ऑफर अंतर्गत, जिओ प्लॅनचा रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना दररोज 10 लाख रुपये किंवा 10 लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस मिळेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 7 सप्टेंबर: रिलायन्स जिओनं अल्पावधीच देशाच्या टेलिकॉम क्षेत्रात दबदबा निर्माण केला आहे. लवकरच रिलायन्स जिओ देशात 5G सेवा द्यायला सुरुवात करणार आहे. जिओ आपल्या ग्राहकांना विविध  प्रकारचे प्लॅन देतं. आता भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ नवीन ग्राहक आकर्षित करण्यासाठी आणि जुन्या ग्राहकांना जोडण्यासाठी विविध आकर्षक ऑफर आणत आहे. आता जिओनं आपल्या 6 व्या वर्धापनदिनानिमित्त ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत जिओ वापरकर्ते फक्त रिचार्ज करून लखपती होऊ शकतात. ही ऑफर काय आहे आणि तुम्ही 10 लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे कशी जिंकू शकता ते जाणून घेऊया:

जिओ अ‍ॅनिव्हर्सरी ऑफर कधीपर्यंत वैध आहे?

Jio ची ही विशेष वर्धापन दिन ऑफर 6 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर 2022 पर्यंत वैध आहे. या ऑफर अंतर्गत, जिओच्या प्लॅनचा रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना दररोज 10 लाख रुपये किंवा 10 लाख रुपयांपर्यंतची बक्षीसं मिळतील.

हेही वाचा: Smartphone on Discount: तब्बल 8 हजारांनी स्वस्त मिळतोय 108MP कॅमेरा असलेला ‘हा’ स्मार्टफोन, वाचा फीचर्स अन् डिटेल्स

10 लाख रुपये कसे जिंकायचे?

या ऑफर कालावधीत 299 रुपये किंवा त्याहून अधिक प्रीपेड प्लॅनसह रिचार्ज करणारे ग्राहक 10 लाख रुपयांपर्यंतच्या भेटवस्तू जिंकण्यास पात्र असतील. जिओनं सांगितले आहे की ही ऑफर तामिळनाडू सर्कलच्या वापरकर्त्यांसाठी लागू नाही. संपूर्ण भारतातील Jio वापरकर्ते या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आणि बक्षिसे जिंकण्यासाठी पात्र असतील. ऑफरच्या इतर अटी आणि शर्ती जिओनं आपल्या ट्विटर पोस्टवर तपशीलवार दिलेल्या नाहीत. 5 सप्टेंबर 2022 रोजी जिओनं व्यवसायात सहा वर्षे पूर्ण केली. ऑफर लाइव्ह आहे आणि रिचार्ज करणारे ग्राहक बक्षिसे जिंकण्यास सक्षम असतील.

Jio 6th Anniversary ऑफर अंतर्गत मिळत आहेत हे फायदे:

या ऑफर अंतर्गत कंपनी तिच्या 2,999 रुपयांच्या प्लॅनवर 6 अतिरिक्त फायदे देत आहे. या प्लॅनचे सदस्यत्व घेणाऱ्या युजर्सना 75 जीबी अतिरिक्त डेटा मोफत मिळत आहे. याशिवाय, कंपनी रिलायन्स डिजिटलकडून 5000 रुपयांच्या खरेदीवर 500 रुपयांची सूटही देत ​​आहे.

First published:

Tags: Reliance Jio, Relince jio