मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

WhatsApp वर मिळणार Jio ची जबरदस्त सुविधा, ग्राहकांना असा होणार फायदा

WhatsApp वर मिळणार Jio ची जबरदस्त सुविधा, ग्राहकांना असा होणार फायदा

ग्राहकांना आणखी नवीन सुविधा देण्यासाठी रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी आणि मुलगा आकाश अंबानी यांनी पुढे पाऊल टाकले असून, जिओ मार्ट ही (Jio Mart) नवी संकल्पना दाखल केली आहे. यासाठी त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) या लोकप्रिय इन्स्टन्ट मेसेजिंग अ‍ॅपचं सहकार्य घेतलं आहे.

ग्राहकांना आणखी नवीन सुविधा देण्यासाठी रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी आणि मुलगा आकाश अंबानी यांनी पुढे पाऊल टाकले असून, जिओ मार्ट ही (Jio Mart) नवी संकल्पना दाखल केली आहे. यासाठी त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) या लोकप्रिय इन्स्टन्ट मेसेजिंग अ‍ॅपचं सहकार्य घेतलं आहे.

ग्राहकांना आणखी नवीन सुविधा देण्यासाठी रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी आणि मुलगा आकाश अंबानी यांनी पुढे पाऊल टाकले असून, जिओ मार्ट ही (Jio Mart) नवी संकल्पना दाखल केली आहे. यासाठी त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) या लोकप्रिय इन्स्टन्ट मेसेजिंग अ‍ॅपचं सहकार्य घेतलं आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 15 डिसेंबर : आजचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील क्रांतीने तर माणसाचे जीवन अमुलाग्र बदलून गेले आहे. स्मार्टफोन्सच्या (Smartphones)सहाय्याने आता अनेक कामे घरबसल्या करता येत आहेत. अगदी दुर्गम भागातही इंटरनेट पोहोचल्याने घरबसल्या शॉपिंग करणे अगदी खेड्यापाड्यातही शक्य झाले आहे. अगदी स्वस्त दरात इंटरनेट उपलब्ध करून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे ती जिओ (Jio) या रिलायन्स उद्योग समूहाच्या (Reliance Industry) मोबाइल सेवा पुरवठा क्षेत्रातील कंपनीने. जिओने देशातील मोबाइल सेवा पुरवठा क्षेत्राचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. अत्यंत वेगवान इंटरनेट, सर्वत्र उपलब्धता आणि त्यासाठी अत्यंत माफक दर यामुळे जिओने देशातील कोट्यवधी ग्राहकांना आपल्याकडे खेचून घेतले आहे.

जिओ या क्षेत्रात पाय रोवण्यासाठी सतत नवनवीन सुविधा देत असून, ग्राहकांना त्यांच्या पैशाचे पुरेपूर मोल मिळावे यासाठी ती प्रयत्न करत आहे. या नव्या आधुनिक युगातील कंपनीची धुराही नवी पिढी सांभाळत आहे. रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी आणि मुलगा आकाश अंबानी हे या कंपनीचे संचालक आहेत. आता ग्राहकांना आणखी नवीन सुविधा देण्यासाठी यांनी पुढे पाऊल टाकले असून, जिओ मार्ट ही (Jio Mart) नवी संकल्पना दाखल केली आहे. यासाठी त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) या लोकप्रिय इन्स्टन्ट मेसेजिंग अ‍ॅपचं सहकार्य घेतलं आहे. यामुळे भारतातील ई-कॉमर्स (E-Commerce) क्षेत्रातही अनेक बदल घडणार असून, ग्राहक आणि व्यापारी यांच्यासाठी अधिक सुविधा निर्माण होणार आहेत. याबाबत इशा आणि आकाश अंबानी (Isha And Akash Ambani) यांनी मेटाच्या (Meta) मुख्य बिझनेस अधिकारी मार्ने लिव्हाईन (Matne Levine) यांच्याशी चर्चा केली. त्या चर्चेतून भारतीय ई-कॉमर्स क्षेत्राचे भविष्यातील चित्र स्पष्ट झाले.

कोरोना विषाणूच्या साथीने आणलेल्या निर्बंधांमुळे आपल्या देशातील ऑनलाइन खरेदीला चांगलीच चालना दिली. त्यामुळे अनेक ई-कॉमर्स कंपन्या चांगल्याच तेजीत आल्या. त्यांचा व्यवसाय या काळात अत्यंत झपाट्याने विस्तारला. मागणी प्रचंड वाढल्याने त्यांना आपला व्यवसाय अगदी खेड्यापाड्यात पोहोचवण्याची संधी मिळाली. यामुळे सर्वसमान्य लोकही अन्न, औषधे ते किराणा सामानापर्यंत सर्व ऑनलाइन खरेदी करण्यास सरावले. या पार्श्वभूमीवर फेसबुकने आयोजित केलेल्या (Facebook) Fuel For India या वार्षिक फ्लॅगशिप इव्हेंटमध्ये देशातील या डिजिटल परिवर्तनाचा लाभ घेणारे अनेक नवीन उपक्रम आणि कल्पना मांडण्यात आल्या, त्यावर चर्चा झाली.

यात लक्षवेधक ठरली ती रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल शाखा असलेल्या जिओ प्लॅटफॉर्मने व्हॉट्सअ‍ॅपच्या सहकार्याने देशातील किरकोळ विक्री क्षेत्रात सुरू केलेली जिओ मार्ट (Jio Mart) ही अभिनव सेवा. जिओ मार्टने अनेक लहान मोठ्या रिटेल व्यावसायिकांना व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून मोठ्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत केली आहे. डिजिटल शॉपिंगमध्ये (Digital Shopping) मेसेजिंगचा विस्तार, जिओने व्हॉट्सअ‍ॅपद्वारे प्रीपेड रिचार्ज कसे सरलीकृत केले आहे आणि दोन्ही कंपन्या कशा प्रकारे क्रांती करत आहेत याबाबत अधिक माहिती यावेळी देण्यात आली.

रिलायन्स जिओमुळे लाखो भारतीयांना परवडणारी इंटरनेट सुविधा उपलब्ध झाल्याने सर्वसामान्य लोकांसाठी आणि व्यवसायांसाठी फार चांगली सुविधा निर्माण झाली असून, मेटाला जिओबरोबर भागीदारी करण्याचा आनंद असल्याचं मार्ने यांनी सांगितलं.

मेटा आणि आम्‍ही दोघांचा असा विश्‍वास आहे की छोटे व्‍यवसाय हे देशाच्या आर्थिक कण्याचा पाया आहेत. किराणा दुकाने, किरकोळ विक्रेते आणि लहान व्यवसायांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपली व्यवसाय करण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे हे या साथीच्या आजाराने प्रकर्षाने जाणवून दिले. या व्यावसायिकांना डिजिटल पद्धतीने सक्षम करण्याची जबाबदारी जिओने घेतली आणि आतापर्यंत व्हॉट्सअ‍ॅपच्या (WhatsApp) सहकार्याने 40 कोटींहून अधिक लोकांना याचा लाभ करून दिला, ही अतिशय आनंदाची बाब असल्याचं यावेळी इशा अंबानी यांनी सांगितलं.

Jio ची जबरदस्त ऑफर, केवळ 1 रुपयांत लाँच केला 30 दिवस वॅलिडिटी प्लॅन; इतका मिळेल डेटा

तितक्याच संख्येने असलेल्या जिओच्या (Jio) सदस्यांना त्यांच्या ग्राहकांशी ऑनलाइन संपर्क साधण्याची सुविधा देण्यासह ई-कॉमर्स सोल्यूशन्सही देता आली, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. ही नैसर्गिक प्रगती आहे, असंही इशा अंबानी यांनी नमूद केलं.

जिओ मार्टकडे सध्या 5 लाखांहून अधिक किरकोळ विक्रेते असून, दररोज त्यांची संख्या वाढत आहेत. जिओ मार्टचे नेटवर्क पाहता ऑनलाइन आणि ऑफलाइनमध्‍ये असणाऱ्या संधीचा जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यावर आमचा भर आहे, असं आकाश अंबानी यांनी सांगितलं. आम्ही मेटासोबतच्या आमच्या भागीदारीबद्दल खूप उत्साहित आहोत आणि व्हॉट्सअॅपच्या सहकार्याने, युजर्सना व्हॉट्सअ‍ॅपवर खरेदी करण्यासाठी मदत मिळेलच पण किरकोळ विक्रेत्यांनाही वैविधी आणण्यात, मार्जिन सुधारण्यात मदत होईल. त्यांना ग्राहकांचा मोठा वर्ग यामुळे उपलब्ध होत आहे, असंही आकाश यांनी सांगितलं.

मुकेश अंबानी यांचा लाखो किरकोळ विक्रेत्यांना (Retailers) जिओ आणि जिओ मार्टद्वारे डिजिटल सक्षम करण्याचा दृष्टीकोन आम्ही पुढे नेत असून, त्यासाठी आम्ही आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे, असं यावेळी इशा यांनी नमूद केलं. व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यास अत्यंत सोपे असल्याने त्याद्वारे जिओमार्टचा अनुभव अतिशय आनंददायी आहे. ऑर्डर देताना ग्राहकांना कोणताही अडथळा येत नाही. ग्राहक सुलभतेत एक क्रांती आहे, असं आकाश यांनी यावेळी स्पष्ट केलं.

ग्राहकाला ब्रेड, लोणी, भाज्या, पेये, घरात आवश्यक असलेली कोणतीही गोष्ट फक्त जिओ मार्टवर ऑर्डर करायची आहे. नियमित खरेदीसाठी स्बस्क्रीप्शन घेतलं किंवा आधीच्या खरेदीनुसारही शिफारसी केल्या जातात. त्यामुळे नवनवीन गोष्टी, उत्तम वस्तू यांची खरेदी सहज होते, असं इशा यांनी सांगितलं.

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे जिओ मोबाईल रिचार्ज (Mobile Recharge)करणेही शक्य झाले आहे, त्याबाबत मार्ने यांनी जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. भारतातील बहुसंख्य मोबाइल फोन वापरकर्ते प्री-पेड रिचार्ज करणारे आहेत. व्हॉट्सअॅपद्वारे जिओ प्रीपेड रिचार्ज अतिशय सुलभ असून, यामुळे ग्राहकांना पूर्वी कधीही नव्हत्या अशा सुविधा मिळत असल्याचे आकाश यांनी सांगितलं. अगदी वृद्ध नागरिकही व्हॉट्सअ‍ॅपद्वारे अगदी सहज पेमेंट करू शकतात, असं इशा आणि आकाश यांनी सांगितलं. व्हॉट्सअ‍ॅपची अशी उपयुक्तता अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. जिओ आणि व्हॉट्सअ‍ॅपची ही भागीदारी देशातील लाखो लोकांसाठी अत्यंत लाभदायी ठरणार आहे याबद्दल मार्ने यांनी आनंद व्यक्त केला.

First published:

Tags: Mukesh ambani, Reliance Jio, Relince jio