मुंबई, 26 ऑक्टोबर: रिलायन्स जिओनं अल्पावधीच मोठी लोकप्रियता मिळवली आहे. अनेक ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यात जिओला यश मिळालं आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रिलायन्स जिओकडून अनेक आकर्षक रिचार्ज प्लॅन आणले जात आहेत. जर तुम्ही देखील Jio च्या टेलिकॉम सेवा वापरत असाल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. देशात अशा लोकांची संख्या खूप जास्त आहे, जे दररोज मोठ्या प्रमाणात इंटरनेट वापरत नाहीत. याशिवाय दुसरीकडे असे बरेच लोक आहेत जे वायफाय राउटरद्वारे इंटरनेट वापरतात. अशा परिस्थितीत त्यांना जास्त मोबाईल डेटाची गरज नसते. या कारणास्तव बरेच लोक अशा रिचार्ज योजनांचा शोध घेतात ज्यामध्ये त्यांना दीर्घ वैधता आणि मर्यादित मोबाइल डेटा मर्यादेसह अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळतो. जर तुम्हीही असा रिचार्ज प्लान शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला जिओच्या एका जबरदस्त रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत. Jio च्या या परवडणाऱ्या प्लॅनमध्ये तुम्हाला 1559 रुपयांच्या रिचार्जमध्ये एकूण 336 दिवसांची वैधता मिळत आहे. या प्लॅनबद्दल सविस्तर जाणून घेऊया -
जिओच्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 1559 रुपये आहे. या प्लॅनचा रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला एकूण 336 दिवसांची वैधता मिळते. अशा स्थितीत हा प्लॅन मोबाईलमध्ये रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही प्लॅन पुन्हा पुन्हा रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही.
हेही वाचा: झटक्यात खटका! WhatsApp वर फालतू मेसेज करणाऱ्यांना 30 सेकंदात असं करा ब्लॉक
जिओचा या प्लॅननं तुमचा मोबाईल रिचार्ज केल्यानंतर तुम्ही इंटरनेटचाही आनंदही घेऊ शकाल. या प्लॅनमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरासाठी एकूण 24 GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज डेटा मर्यादेचा लाभ मिळत नाही.
24 GB इंटरनेट डेटाची वैधता एकूण 336 दिवसांसाठी असेल. इंटरनेट डेटा संपल्यावर तुम्ही तुमच्या मोबाईलमधील प्लॅन्समध्ये डेटा अॅड रिचार्ज करू शकता आणि इंटरनेटचा आनंद घेऊ शकता.
जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला मेसेजिंगसाठी एकूण 3600 एसएमएस मिळत आहेत. जिओचा हा प्लान रिचार्ज केल्यानंतर तुम्ही Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security अॅप देखील वापरू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Recharge, Reliance Jio