जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Work From Home करणाऱ्यांसाठी Jio चा 365 दिवसांसाठी प्लॅन, फ्री कॉलिंगसह मिळणार इंटरनेट डेटा

Work From Home करणाऱ्यांसाठी Jio चा 365 दिवसांसाठी प्लॅन, फ्री कॉलिंगसह मिळणार इंटरनेट डेटा

Work From Home करणाऱ्यांसाठी Jio चा 365 दिवसांसाठी प्लॅन, फ्री कॉलिंगसह मिळणार इंटरनेट डेटा

Jio ने ग्राहकांसाठी वार्षिक प्लॅन ऑफर केले असून त्यासोबत डेटा अॅड ऑनमध्येही काही नवीन प्लॅन लाँच केले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 08 मे : देशात कोरोनामुळे 24 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरू केलं आहे. वर्क फ्रॉम होम कऱणाऱ्यांसाठी जिओने नवीन प्लॅन लाँच केले आहेत. एअरटेल आणि व्होडाफोन आयडियापेक्षा जास्त फायदा या प्लॅनमध्ये मिळत आहे. प्रिपेड ग्राहकांसाठी वार्षिक प्लॅन ऑफर केले असून त्याशिवाय डेटा अॅड ऑनमध्येही काही प्लॅन लाँच केले आहेत. एअरटेल आणि  व्होडाफोन आयडियाचे अनुक्रमा 2398 आणि 2399 वार्षिक प्लॅन आहेत. त्यामध्ये दररोज दीड जीबी इंटरनेट डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएस मिळतात. त्या तुलनेत जिओच्या वार्षिक प्लॅनमध्ये 2399 रुपयांत 365 दिवस दररोज 2 जीबी डेटा ऑफर केला आहे. याशिवाय अनलिमिटेड कॉल आणि SMS सुद्धा मिळणार आहेत. जिओने आणखी एक वार्षिक प्लॅन दिला आहे. 2121 रुपयांच्या प्लॅनमध्ये 365 दिवसांसाठी दररोज दीड जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह एसएमएस सुविधा मिळणार आहे. डेली डेटा संपल्यानंतर अॅड ऑन पॅकही जिओने ऑफर केले आहेत. यामध्ये आधीपासूनच 11 ते 51 रुपयांपर्यंत आणि 301 रुपयांचा पॅक उपलब्ध आहे. त्यात आता नवीन डेटा अॅड ऑन पॅक देण्यात आले आहेत. 151, 201 आणि 251 रुपयांचे प्लॅन असून यावर अनुक्रमे 30, 40 आणि 50 जीबी डेटा मिळणार आहे. हा डेटाची वैधता आधीच्या प्लॅननुसार असणार आहे. हे वाचा : Jio, Airtel, Vodafone Idea चे स्वस्तातले प्लॅन, रिचार्जवर मिळतात ‘हे’ फायदे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात