मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

India@75: इस्रो अशी संस्था ज्याने अंतराळात भारताचा दबदबा; हे 5 मिशन ठरले टर्निंग पॉईंट

India@75: इस्रो अशी संस्था ज्याने अंतराळात भारताचा दबदबा; हे 5 मिशन ठरले टर्निंग पॉईंट

भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रोने आपल्या कामगिरीने भारताला जगाच्या नकाशावर एक वेगळी ओळख दिली आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रोने आपल्या कामगिरीने भारताला जगाच्या नकाशावर एक वेगळी ओळख दिली आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रोने आपल्या कामगिरीने भारताला जगाच्या नकाशावर एक वेगळी ओळख दिली आहे.

    यंदा भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या 75 वर्षात देशाला मोठं करण्यात अनेकांनी आपलं योगदान दिलं आहे. भारत आज अनेक क्षेत्रात आघाडीवर आहे. विज्ञानापासून तंत्रज्ञानापर्यंत देश स्वयंपूर्ण झाला आहे. आधुनिक जगात विज्ञानाच्या वाढत्या प्रभावादरम्यान, भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रोने आपल्या कामगिरीने भारताला जगाच्या नकाशावर एक वेगळी ओळख दिली आहे. जिथे पूर्वी भारत आपल्या उपग्रहासाठी इतर देशांवर अवलंबून होता, तिथे आता इतर देश आपले उपग्रह पृथ्वीच्या बाहेर पाठवण्यासाठी इस्रोची (ISRO) मदत घेत आहेत. 1969 मध्ये, भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जाणारे विक्रम साराभाई यांच्या दूरदृष्टीने इस्रोची स्थापना झाली. त्यांनी बनवलेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव आर्यभट्ट होते, जो 19 एप्रिल 1975 रोजी सोव्हिएत युनियन (रशिया) च्या मदतीने पृथ्वीवरून सोडण्यात आला होता. ISRO ने वेळोवेळी सिद्ध केले आहे की ते 'एकूणच राष्ट्रीय विकासासाठी अंतराळ तंत्रज्ञान प्रगत करण्याच्या' दृष्टीच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. जाणून घेऊया इस्रोच्या 5 अभिमानास्पद कामगिरी चंद्रयान-1 22 ऑक्टोबर 2008 रोजी हे स्वदेशी मानवरहित अवकाशयान चंद्राच्या पृष्ठभागावर पाठवण्यात आले. यापूर्वी जगातील फक्त 6 देश हे करू शकले होते. इस्रोची ही पहिलीच मोहीम होती, ज्याने शतकातील सर्वात मोठा शोध लावताना चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याचे जगाला सांगितले. चांद्रयान PSLV-C 11 रॉकेटमधून प्रक्षेपित करण्यात आले. चांद्रयान-1 चंद्रावर जाण्यासाठी पाठवण्यात आले होते. चांद्रयान 1 ने सुमारे 11 महिने काम केले आणि चंद्राभोवती 3400 हून अधिक प्रदक्षिणा केल्या. चांद्रयान-1 च्या शोधाने त्यावेळी जगातील अनेक बलाढ्य देशांनाही आश्चर्यचकित केले होते. मंगळयान 5 नोव्हेंबर 2013 रोजी, ISRO ने सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLV-C 25 द्वारे मंगळयान उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केला, ज्याने 24 सप्टेंबर 2014 रोजी मंगळाच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवून जगात एक नवीन स्थान प्राप्त केले. भारतासाठी ही एक मोठी उपलब्धी होती, कारण एकाच प्रयत्नात मंगळाच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवणारा भारत हा जगातील एकमेव देश बनला होता. मंगळयान मोहिमेला सर्वात स्वस्त मिशन देखील म्हटले जाते. यासाठी केवळ 450 कोटी रुपये खर्च करण्यात आले. सोव्हिएत युनियन, रशिया, अमेरिका आणि युरोपियन स्पेस एजन्सीनंतर भारतानेही मंगळावर यान पाठवणाऱ्यांच्या यादीत नाव नोंदवले होते. जीएसएलवी मार्क-3 चे यशस्वी प्रक्षेपण (GSLV-MK 3) मंगळयानाच्या यशानंतर, डिसेंबर 2014 मध्ये देशातील सर्वात मोठे रॉकेट, जिओसिंक्रोनस लॉन्च व्हेइकल, मार्क 3 (GSLV मार्क-3) चे यशस्वी प्रक्षेपण करून, इस्रोने जगाला दाखवून दिले की भारत आता जड वाहने आणि मानवांना अंतराळात पाठण्यासाठी सक्षम झाला आहे. मानवाला अवकाशात पाठवण्याची क्षमता सध्या फक्त अमेरिका, रशिया आणि चीनकडे आहे. 104 सेटेलाइट लॉन्च वर्ष 2014 मध्ये, इस्रोने एका मेगा मिशनद्वारे एक नवीन जागतिक विक्रम केला होता. भारताने PSLV अंतराळयानाद्वारे 104 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले. यापूर्वी हा विक्रम रशियाच्या नावावर होता, ज्याने एकाच वेळी 37 उपग्रह प्रक्षेपित करून जागतिक विक्रमात आपले नाव नोंदवले होते. भारताच्या या प्रक्षेपणात 101 छोटे उपग्रह होते, ज्यांचे वजन 664 किलो होते. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शाळेची बस ज्या प्रकारे मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी सोडते त्याच पद्धतीने ते अंतराळात सोडण्यात आले. जीएसएलवी मार्क 2(GSLV-MK 2) GSLV मार्क 2 चे यशस्वी प्रक्षेपण ही ISRO ची एक मोठी उपलब्धी होती. कारण, त्यात स्वदेशी बनावटीचे क्रायोजेनिक इंजिन बसवण्यात आले होते. या यशानंतर भारताला उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इतर देशांची मदत घ्यावी लागली नाही, भारत पूर्णपणे स्वावलंबी झाला.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Achievements@75, Independence day, Isro

    पुढील बातम्या