मुंबई, 22 नोव्हेंबर: इन्स्टाग्राम हा एक अतिशय लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. जगभरातील अनेक लोक इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले गेले आहेत. परंतु ते मुख्यतः फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म म्हणून वापरलं जातं. लोक त्यावर त्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ अपलोड करतात. यामुळेच इन्स्टाग्राम हे कंटेंट क्रिएटर्सच्या आवडत्या सोशल मीडिया अॅप्सपैकी एक आहे. लोक त्यांच्यातील स्पेशल गोष्टी या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करतात आणि सोशल मीडिया सेलिब्रिटी बनतात. मात्र याला आणखी एक बाजू अशी आहे की, अनेकवेळा त्यांना अश्लील कमेंटलाही सामोरं जावं लागते. या टिप्पण्या खूप वैयक्तिक आणि खालच्या पातळीच्या असू शकतात. आपल्या वापरकर्त्यांना अशा अश्लील टिप्पण्यांपासून वाचवण्यासाठी इंस्टाग्रामनं हिडन वर्ड्स नावाचं एक नवीन फीचर लाँच केलं आहे. हे त्यांच्या वापरकर्त्यांना आक्षेपार्ह टिप्पण्या किंवा कंटेंटपासून संरक्षण करतं. तुम्ही ते चालू केल्यास अयोग्य सामग्री किंवा टिप्पण्या आपोआप फिल्टर केल्या जातील. हिडन वर्ड्स फीचर (Hidden words) काय आहे? ही अशा वाक्यांची, शब्दांची आणि इमोजींची यादी आहे ज्यामुळे वापरकर्त्याला त्रास होऊ शकतो. तुम्ही हिडन वर्ड्स सक्रिय केल्यास, या सूचीमध्ये कोणताही मजकूर असेल, तो तुम्हाला कोणत्याही टिप्पणी किंवा संदेशात दिसणार नाही. यामुळं युजरला आक्षेपार्ह कंटेंटपासून पूर्ण आराम मिळेल असं नाही, पण काही प्रमाणात त्याचा परिणाम नक्कीच दिसून येतो. इंस्टाग्रामचा दावा आहे की या फीचरच्या वापरकर्त्यांना 40 टक्क्यांपर्यंत कमी आक्षेपार्ह मजकूर दिसेल. हेही वाचा: PHOTOS: व्हॉट्सअॅपवर कोणीही डिलीट केलेला मॅसेज वाचता येणार; सोप्पी आहे प्रोसेस हे फीचर कसं सुरु करावं?
- कोणत्याही डिव्हाइसवर Instagram उघडा.
- त्यानंतर तुमच्या प्रोफाइलवर जा.
- वरच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन ओळींच्या मेनूवर क्लिक करा.
- यामध्ये प्रायव्हसीचा पर्याय निवडा.
- येथे Hidden words पर्यायावर क्लिक करा.
- आता हाइड कमेंट्स, एडव्हान्स कमेंट फिल्टरिंग आणि मेसेज रिक्वेस्ट ऑफ्शन
एकूण कमेंटची संख्या बदलणार नाही- जर तुम्ही हिडन वर्ड फीचर वापरत असाल, तर नक्कीच आक्षेपार्ह मजकूर काढून टाकला जाईल, परंतु यामुळे कमेंटच्या संख्येवर परिणाम होणार नाही. कमेंट कोणालाही दिसणार नाहीत पण संख्या तशीच राहील. तुम्ही या लिस्टमध्ये तुम्ही ते शब्द, कमेंट, वाक्ये, इमोजी जोडू शकता, जे तुम्हाला पाहायचे नाहीत.