मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /अंतराळ कार्यक्रमात भारताची नवी झेप; तीन उपग्रहांसह पहिलं खासगी रॉकेट केलं लॉंच

अंतराळ कार्यक्रमात भारताची नवी झेप; तीन उपग्रहांसह पहिलं खासगी रॉकेट केलं लॉंच

अंतराळ कार्यक्रमात भारताची नवी झेप; तीन उपग्रहांसह पहिलं खासगी रॉकेट केलं लॉंच

अंतराळ कार्यक्रमात भारताची नवी झेप; तीन उपग्रहांसह पहिलं खासगी रॉकेट केलं लॉंच

भारताने आतापर्यंत अंतराळ विज्ञान क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. भारताची या क्षेत्रातील यशस्वी घोडदौड अजूनही सुरूच आहे. नुकतेच भारताने विक्रम -एस. नावाचं पहिलं रॉकेट शुक्रवारी (13 नोव्हेंबर 22) तीन उपग्रह घेऊन यानातून अंतराळात पाठवलं.

पुढे वाचा ...
 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 19 नोव्हेंबर: भारताने आतापर्यंत अंतराळ विज्ञान क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. भारताची या क्षेत्रातील यशस्वी घोडदौड अजूनही सुरूच आहे. नुकतेच भारताने विक्रम -एस. नावाचं पहिलं रॉकेट शुक्रवारी (13 नोव्हेंबर 22) तीन उपग्रह घेऊन यानातून अंतराळात पाठवलं. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या नावावरून या सहा मीटर लांब रॉकेटला विक्रम-एस हे नाव देण्यात आलं आहे. शुक्रवारी सकाळी 11.30 मिनिटांनी हे रॉकेट लाँच झालं. विशेष म्हणजे हे रॉकेट एका स्टार्टअपने विकसित केलं आहे. तसंच या रॉकेटमधून अंतराळात झेपावलेले तीन उपग्रह हेदेखील स्टार्टअपने तयार केलेले आहेत. या यशस्वी मोहिमेविषयी इस्रोनं ट्विट केलं आहे. या यशस्वी मोहिमेबद्दल जगभरातून भारताचं कौतुक होत आहे.

  भारताचं पहिलं खासगी विक्रम-एस नावाचं रॉकेट तीन उपग्रहांना घेऊन शुक्रवारी अंतराळाकडे झेपावलं. विक्रम-एस हे रॉकेट स्कायरुट एरोस्पेस या स्टार्टअपनं विकसित केलं आहे. एका नव्या सुरुवातीचं प्रतीक म्हणून या मोहिमेला `प्रारंभ` असं नाव देण्यात आलं आहे. चेन्नईतील स्टार्टअप स्पेस किड्झ, आंध्र प्रदेशातील स्टार्टअप एन-स्पेस टेक आणि आर्मेनियाई स्टार्टअप बाझूमक्यू स्पेस रिसर्च लॅबचे उपग्रह घेऊन विक्रम-एस अंतराळात गेलं आहे. या रॉकेटच्या यशस्वी लॉंचिंगनंतर इस्रोनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये इस्रोनं "मोहिमेचा प्रारंभ यशस्वीपणे पूर्ण झाला. स्कायरुट आणि भारताचं अभिनंदन," असं म्हटलं आहे.

  हेही वाचा: Car Offers : ‘या’ 5 कारच्या खरेदीवर मिळतीये तगडी सूट, डिस्काउंटच्या पैशात येईल आयफोन 13

  स्कायरुट एरोस्पेसने दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेसाठी 2020 पासून काम सुरू झालं आणि विक्रम-एसची निर्मिती दोन वर्षाच्या विक्रमी कालावधीत करण्यात आली. विक्रम-एसची सॉलिड फ्युएल प्रोपल्शन, कटिंग एज एवियोनिक् आणि कार्बन फायबर कोअर स्ट्रक्चर ही वैशिष्ट्य आहेत. विक्रम-एसचं वजन 545 किलो, लांबी सहा मीटर आणि व्यास 0.375 मीटरआहे. विक्रम-एस हे अंतराळात पोहोचण्यासाठी सर्वात किफायतशीर आणि वेगवान साधन आहे, असं स्कायरुटने म्हटलं आहे.

  दरम्यान, स्कायरुट एरोस्पेसने विक्रम-एसच्या लॉंचिंगची युट्यूब लिंक शेअर करताना ट्विटमध्ये लिहिलं आहे, "89.5 किलोमीटरची उंची गाठली आहे. विक्रम -एस रॉकेटने उड्डाणाचे सर्व निकष पूर्ण केले आहेत. भारतासाठी ही ऐतिहासिक घटना आहे. "केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान, अंतराळ राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ट्विटरवर स्कायरुट एअरोस्पेसच्या टीमच्या सदस्यांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलं आहे, ``स्कायरूट एरोस्पेसच्या स्टार्टअप टीमसोबत श्रीहरिकोटा येथे भारताचे पहिले खासगी रॉकेट विक्रम-एस लॉंच होण्याच्या काही वेळापूर्वी. या रॉकेटचं नाव भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्या नावावरून ठेवलं गेलं आहे. काउंटडाउन सुरू."

  First published:

  Tags: Isro, Spacecraft