स्कूटी चालवताना बॅलन्स जाणार नाही, आदेश देताच होईल पार्क

स्कूटी चालवताना बॅलन्स जाणार नाही, आदेश देताच होईल पार्क

गाडी चालवताना सुरुवातीला तोल जाण्याची शक्यता असते मात्र आता तसे होणार नाही. सेल्फ बॅलन्सिंग टेक्नॉलॉजी असलेली स्कूटरचा शोध लावण्यात आला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : दिवसेंदिवस तंत्रज्ञात बदल होत आहेत. गाड्यांमध्ये अनेक नव्या सिस्टीम येत आहेत. भारतात स्वत:हून बॅलन्स सांभाळणारी स्कूटर तयार झाली आहे. या स्कूटरचं हे खास वैशिष्ट्य असून गाडी चालवताना तोल जाण्याची भीती नाही. याची सेल्फ बॅलन्सिंग टेक्नॉलॉजी जबरदस्त आहे.

भारतीय स्टार्ट अप Liger Mobility ने ही स्कूटर तयार केली आहे. IIT आणि ISB च्या माजी विद्यार्थ्यांनी ही स्कूटर तयार केली आहे. सेल्फ बॅलन्सिंगसोबत व्हॉईस कमांडवरही काम चालतं. सध्या यावर प्रयोग सुरू असून प्रत्यक्ष बाजारात येण्यास अजुन वेळ आहे.

स्कूटरचा व्हिडिओ युट्यूबवर टाकण्यात आला आहे. यात स्कूटर कशी चालते. त्याच्या व्हॉईस कमांडचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले आहे.

स्कूटरचे आणखी एक खास फिचर आहे ते म्हणजे 'Feet always onboard' या फिचरमुळे चालकाला त्याचे पाय जमिनीवर ठेवावे लागत नाहीत. तो स्कूटरच्या फ्लोअरबोर्डवरच पाय ठेवू शकतो. बॅलन्ससाठी स्कूटरमध्ये एक डिव्हाईस डेव्हलप करण्यात आलं आहे. त्यामुळे चालकाचा तोल जात नाही. जर स्कूटर दुसऱ्या गाडीला धडकली तरी डिव्हाइसमुळे गाडी खाली पडणार नाही.

दोन वर्षाचं संशोधन केल्यानंतर डिव्हाइस तयार करणय्ता आलं. ही स्कूटर पेट्रोल आणि इलेक्ट्रिक दोन्हींवर चालू शकेल. हे डिव्हाइस इतर गाड्यांमध्ये वापरलं तरी किंमतीत फक्त 10 टक्के वाढ होईल.

याआधी होंडा आणि BMW यांनीही सेल्फ बॅलन्सिंग प्रोडक्टचा प्रोटोटाइप दाखवला आहे. आगामी काळात टू व्हिलर्समध्ये याचा वापर होईल. सध्या मात्र यासाठी काही काळ वाट बघावं लागेल.

VIDEO : सातारा पोटनिवडणूक होणार नाही, उदयनराजेंबद्दल भाजपची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2019 09:09 PM IST

ताज्या बातम्या