Home /News /technology /

पहिल्यांदाच लाँच झालं 9,900मध्ये Appleचं प्रॉडक्ट; काय असेल iPhone 12ची भारतातली किंमत?

पहिल्यांदाच लाँच झालं 9,900मध्ये Appleचं प्रॉडक्ट; काय असेल iPhone 12ची भारतातली किंमत?

i Phoneच्या नव्या सीरिजचा व्हर्च्युअल इव्हेंट नुकताच पार पडला. या इव्हेंटमध्ये i Phone 12च्या सीरिजचं लाँच करण्यात आलं. जाणून घेऊया या नव्या सीरिजमध्ये काय खास आहे आणि भारतातील किंमत किती असेल.

    यानवी दिल्ली, 14 ऑक्टोबर: बहुप्रतिक्षित iPhone 12चा लाँच इव्हेंट नुकताच पार पडला. या इव्हेंटमध्ये iPhone 12, iPhone 12Pro, iPhone 12 Pro Max, iPhone 12 Mini असे आयफोनची नवीन मॉडेल्स लाँच करण्यात आली आहेत. आयफोन्सची सगळ्या मॉडेल्समध्ये 5G तंत्रज्ञान देण्यात आलं आहे. भारतामध्ये ही नवीन सीरिज 30 ऑक्टोबरपासून उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, Appleने पहिल्यांदाच 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत एक प्रॉडक्ट लाँच केलं आहे. Appleच्या HomePodची किंमत 9,900 असणार आहे. iPhone 12 Pro Max- या फोनमध्ये LiDAR सेंसर देण्यात आला आहे. लो लाईट फोटोग्राफी करण्याची आवड असणाऱ्यांना हे फिचर अत्यंत फायदेशीर ठरु शकतं. iPhone 12 Pro Maxमध्ये 3 रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. या कॅमेरा सेटअपमध्ये लो लाईट फोटोग्राफी, ऑप्टिकल इमेज स्टेबेलाजेशन आणि 5X ऑप्टिकल झूम लेन्स देण्यात आली आहे. iphone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max ची भारतातील किंमत 1,19900 ते 1,29900 रुपये या रेंजमध्ये आहे. यामध्ये गोल्ड, सिल्व्हर आणि पॅसिफिक ब्लू असे रंग देण्यात आले आहे. iPhone 12 - या आयफोनची विशेष गोष्ट अशी की, iPhone 12च्या फ्रंट कॅमेरामध्ये नाईट मोडचा सपोर्ट देण्यात आला आहे. तसंच या फोनमध्ये देण्यात आलेला प्रोसेसर आर्टिफिशियल इंटलिजन्स आणि लर्निंग बेस्ड Appsदेखील सपोर्ट करणार आहेत.  iPhone 12मध्ये A15Bionic चिपसेट देण्यात आली आहे. iPhone 12चा प्रोसेसर सर्वात फास्ट आहे. अशी माहिती कंपनीने दिली आहे. तसंच यात 2 रिअर कॅमेरा देण्यात आले आहेत.  iPhone 12 आणि iPhone12Pro Mini 64GB, 128GB, 256GB या व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहेत. तसंच हिरवा, काळा, पांढरा आणि निळा अशा 4 रंगामध्ये या फोन्सची मॉडेल्स ग्राहकांना घेता येतील. या फोनची भारतातील किंमत 79,900 पासून 69,900 रुपये या रेंजमध्ये आहे. iPhone12Pro Mini- या iPhoneला 5.4 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. या फोनमध्येही 5G सपोर्ट देण्यात आला आहे. iPhone12Pro Mini इतर फिचर्स iPhone 12 सारखीच आहेत. हा जगातील सर्वात पातळ आणि छोटा फोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. iPhone आणि Apple Watchला आता फोल्डिंग चार्जरने चार्ज करता येणार आहे. MagSafe सपोर्ट फक्त नव्या आयफोन्समध्येच देण्यात आला आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Apple, Smartphones, Technology

    पुढील बातम्या