नवी दिल्ली 21 जून : चांगला जॉब मिळविण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असतो, एखादा चांगला जॉब मिळाला की, महत्त्वाचा प्रश्न असतो तो पीएफचा, बऱ्याचदा ईपीएफ (EPFO) ट्रान्सफरबाबत प्रक्रिया पूर्ण होण्यास खूप कालावधी लागतो, असा अनेकांचा अनुभव असतो. पीएफ ऑफिसमध्ये (EPFO) फॉर्म भरा, फेऱ्या मारा, त्यामुळे याचं टेन्शन असतं. मात्र, आता हे टेन्शन राहिलेलं नाही, शिवाय पीएफ ऑफिसमध्येही जाण्याची गरज नाही, कारण ऑनलाईन पद्धतीने काही मिनिटांतच जुन्या ठिकाणचा पीएफ नवीन जॉब करणाऱ्या कंपनीत ट्रान्सफर होईल. त्याची प्रक्रियाही सोपी झाली आहे.
जेंव्हा नवीन जॉब जॉईन करतो त्यावेळी तुमचा पीएफ तुमच्या आधीच्या कंपनीतून नवीन कंपनीत ट्रान्सफर करायचा असतो, ते आता सहज शक्य झाले आहे. नियमानुसार खाजगी क्षेत्रात काम करणारी व्यक्ती दुसऱ्या कंपनीत जॉईन होत असताना EPFO खातं ट्रान्सफर करण्याची गरज असते. मात्र, हे काम करण्यासाठी EPFO च्या स्थानिक कार्यालयात जाण्याची गरज नाही. ईपीएफ ग्राहक त्यांच्या ईपीएफ खात्यातील रक्कम ऑनलाइन सहज ट्रान्सफर करू शकतात.
काळानुसार बदलत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) डिजिटल रूप धारण करत जवळपास सर्वच सेवा या ऑनलाईन केल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना प्रत्येकवेळी पीएफ ऑफिसमध्ये फेऱ्या मारण्याची गरज नाही. त्यांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने ई-नॉमिनेशन बरोबरच UAN (Universal Account Number) तयार करता येतो. तसंच, ईपीएफ खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी, खातेदारांना यापुढे कार्यालयात जाण्याची अथवा स्लिप घेण्याची वाट पाहत बसण्याचीही गरज नाही. ते ईपीएफओ केवायसी ऑनलाइनही अपडेट करू शकतात.
आता पाहूया, ट्रान्सफरसाठीच्या महत्त्वाच्या गोष्टी
ईपीएफ खाते ऑनलाइन ट्रान्सफरसाठी, तुमचा UAN नंबर UAN पोर्टलवर अॅक्टिव्ह करणं आवश्यक आहे. तसंच अॅक्टिव्हेशनसाठी वापरण्यात येणारा मोबाईल नंबरही अॅक्टिव्ह असावा. याशिवाय, कर्मचार्याचं बँक खातं आणि IFSC कोडदेखील UAN शी लिंक केलेले पाहिजेत आणि कर्मचार्याचं e-KYC देखील मंजूर केलेलं असायला हवं.
ऑनलाइन पैसे ट्रान्सफर कसे करायचे?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.