मुंबई, 6 फेब्रुवारी : मेटा कंपनीचं व्हॉट्सअॅप हे मेसेजिंग अॅप गेल्या काही वर्षांत खूपच लोकप्रिय झालं आहे. व्हॉट्सअॅपचा वापर केवळ मेसेजपुरता मर्यादित न राहता फोटो, व्हिडिओ, ऑडिओ शेअरिंगसाठीदेखील केला जात आहे. ऑफिसेसमध्येदेखील विविध कामांसाठी व्हॉट्सअॅप वापरलं जात आहे. व्हॉट्सअॅपची वाढती लोकप्रियता पाहता अॅपमध्ये सातत्याने काही चांगले बदल केले आहेत. बऱ्याचदा ड्रायव्हिंग करतेवेळी किंवा गर्दीच्या ठिकाणी आपण व्हॉट्सअॅपवरच्या मेसेजला उत्तर देऊ शकत नाही. अशा वेळी अर्जंट मेसेज करायचा झाल्यास मोठी अडचण होते. आता याबाबत चिंता करण्याची गरज नाही. एका खास ट्रिकच्या मदतीने टायपिंग न करतादेखील व्हॉट्सअॅपद्वारे मेसेज पाठवू शकता. ही ट्रिक नेमकी कशी वापरायची ते जाणून घेऊ या.
रस्त्यावर गाडी चालवताना किंवा गर्दीच्या ठिकाणी व्हॉट्सअॅपवर मेसेज टाइप करणं शक्य नसतं; मात्र आता एका ट्रिकच्या मदतीनं ड्रायव्हिंग करतेवेळी किंवा गर्दीच्या ठिकाणीदेखील व्हॉट्सअॅपवर टायपिंग न करता मेसेज पाठवू शकता. व्हॉट्सअॅप युझर्स यासाठी व्हर्च्युअल असिस्टंटची मदत घेऊ शकतात. आयफोन आणि अँड्रॉइड फोनमध्ये अशा पद्धतीने मेसेज पाठवण्याची पद्धत वेगवेगळी आहे.
आयफोनवर व्हॉट्सअॅपवर व्हर्च्युअल असिस्टंटच्या मदतीने मेसेज पाठवायचा असेल तर सर्वप्रथम सिरी अॅक्टिव्हेट करावं लागेल. त्यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन Siri and Search वर क्लिक करून टॉगल ऑन करा. त्यानंतर अॅप्सवर जाऊन व्हॉट्सअॅपवर क्लिक करा. त्यानंतर तिथे तुम्हाला USe With Ask Siri टॉगल ऑन करावा लागेल. त्यानंतर तुम्ही अगदी सहजपणे व्हॉट्सअॅपवर टायपिंग न करता कॉन्टॅक्ट्सला मेसेज सेंड करू शकता.
अँड्रॉइड फोन वापरत असाल तर व्हॉट्सअॅपवर टायपिंग न करता मेसेज सेंड करण्यासाठी गुगल असिस्टंटची मदत घ्यावी लागेल. यासाठी सर्वप्रथम स्मार्टफोनमधलं गुगल असिस्टंट अॅप अॅक्टिव्हेट करावं लागेल. त्यासाठी अॅप ओपन करून Hey Google हे शब्द उच्चारावे लागतील. व्हर्च्युअल असिस्ंटटने रिस्पॉन्स दिल्यानंतर तुम्ही व्हॉट्सअॅपवर एखाद्या व्यक्तीला किंवा ग्रुपवर बोलून मेसेज सेंड करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचे कॉन्टॅक्ट योग्य नावाने सेव्ह करावे लागतील जेणेकरून चुकीच्या व्यक्तीला मेसेज जाणार नाही. एकदा मेसेज पूर्ण वाचल्यानंतर ज्या व्यक्तीला मेसेज पाठवायचा आहे, तो त्यालाच जाणार आहे की नाही हे तपासल्यानंतर Okay Send It अशी कमांड देऊन प्रोसीड करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Whatsapp