जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / लॅपटॉपची बॅटरी मोक्याच्या क्षणी देते दगा? लगेच करा हा सोपा बदल!

लॅपटॉपची बॅटरी मोक्याच्या क्षणी देते दगा? लगेच करा हा सोपा बदल!

लॅपटॉपची बॅटरी महत्त्वाच्या कामावेळी ठप्प होते का?

लॅपटॉपची बॅटरी महत्त्वाच्या कामावेळी ठप्प होते का?

कम्प्युटर, लॅपटॉप आणि स्मार्टफोन ही सध्याच्या काळातली आवश्यक गॅजेट्स आहेत. बहुतांश कामं ऑनलाइन झाल्याने या गॅजेट्सची प्रत्येकाला गरज भासते.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 29 जून : कम्प्युटर, लॅपटॉप आणि स्मार्टफोन ही सध्याच्या काळातली आवश्यक गॅजेट्स आहेत. बहुतांश कामं ऑनलाइन झाल्याने या गॅजेट्सची प्रत्येकाला गरज भासते. कोरोना काळापासून वर्क फ्रॉम होममुळे लॅपटॉपचा वापर वाढला आहे. लॅपटॉपचा वापर करताना बऱ्याचदा आपल्याला काही समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यात लॅपटॉपचा बॅटरी बॅकअप ही प्रमुख समस्या आहे. काही बारीकसारीक गोष्टी लक्षात घेतल्या, तर लॅपटॉपचा बॅटरी बॅकअप वाढवता येतो. यासाठी लॅपटॉपच्या सेटिंग्जमध्ये काही बदल करावे लागतात. हे बदल कोणते ते सविस्तर जाणून घेऊ या. लॅपटॉप कमी बॅटरी बॅकअप देत असेल, तर त्यामुळे बऱ्याचदा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ही समस्या दूर करण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्सचा वापर उपयुक्त ठरू शकतो. या टिप्समुळे तुम्हाला पॉवर बँकचा वापर किंवा अ‍ॅप्स इन्स्टॉल करावी लागणार नाहीत. विंडोज लॅपटॉपची बॅटरी लवकर संपण्याचं सर्वांत मोठं कारण म्हणजे बॅकग्राउंडला अ‍ॅप्स सुरू असणं; मात्र अशा अ‍ॅप्सविषयी बहुतांश युझर्सना फारशी माहिती नसते. त्यामुळे इंटरनेटसोबत ही अ‍ॅप्स सुरू राहिल्याने बॅटरीचा वापर जास्त होतो. नको असलेली अ‍ॅप्स बंद करण्यासाठी टास्क बारवर राइट क्लिक करून टास्क मॅनेजरमध्ये जा. तिथं अ‍ॅप्समधल्या डिझायर्ड प्रोसेसवर राइट क्लिक करा आणि त्यानंतर एन्ड टास्क सिलेक्ट करा. या पद्धतीचा वापर करून नको असलेली अ‍ॅप्स बंद होतील आणि बॅटरी बॅकअप वाढेल. जेव्हा लॅपटॉपची बॅटरी एका विशिष्ट टक्केवारीपर्यंत पोहोचते तेव्हा बॅटरी सेव्हर हे फीचर ऑटोमॅटिक सक्रिय होते. बॅटरीचा कालावधी वाढवण्यासाठी तुम्ही हे फीचर कधीही मॅन्युअली सुरू करू शकता. तसंच तुम्ही हे फीचर अ‍ॅक्शन सेंटरमधूनदेखील अ‍ॅक्टिव्हेट करू शकता. जेव्हा ब्लूटूथ आणि वाय-फायचा वापर करत नसाल, तेव्हा ही दोन्ही फीचर्स डिसेबल करावीत. यामुळे लॅपटॉपचा बॅटरी बॅकअप वाढू शकतो. ब्लूटूथ आणि वाय-फाय ही दोन्ही फीचर्स तुम्ही अ‍ॅक्शन सेंटरमधून अ‍ॅक्टिव्हेट करू शकता. लॅपटॉपच्या डिस्प्ले ब्राइटनेसमुळे बॅटरीचा जास्त वापर होतो. ब्राइटनेस कमी करण्यासाठी Windows Key आणि A या दोन्ही कीज एका वेळी प्रेस कराव्यात. अ‍ॅक्शन सेंटरमधल्या स्लाइडरचा वापर करून तुम्ही स्क्रीन ब्राइटनेस सेट करू शकता. बहुतांश लॅपटॉपमध्ये यासाठी शॉर्टकट असतो. बरीच स्टार्टअप अ‍ॅप्लिकेशन्स केवळ बॅटरीवरचा लोड वाढवत नाहीत, तर सिस्टीमचा बूट टाइमदेखील वाढवतात. नको असलेली स्टार्टअप अ‍ॅप्लिकेशन्स डिसेबल करण्यासाठी Task Manager>Startup apps>Right -Click on app> Select Disable या ऑप्शनचा वापर करावा. अशा सोप्या ट्रिप्सचा वापर करून तुम्ही तुमच्या लॅपटॉपच्या बॅटरीचा बॅकअप वाढवू शकता.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात