मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

फिजिकल सिमकार्डला करा बाय-बाय! असं मिळवा e-SIM कार्ड, वाचा फायदे

फिजिकल सिमकार्डला करा बाय-बाय! असं मिळवा e-SIM कार्ड, वाचा फायदे

फिजिकल सिमकार्डला करा बाय-बाय! असं मिळवा e-SIM कार्ड, वाचा फायदे

फिजिकल सिमकार्डला करा बाय-बाय! असं मिळवा e-SIM कार्ड, वाचा फायदे

e-Sim benefits: फिजिकल सिम कार्डच्या विपरीत ई-सिम डिव्हाइसमध्ये एम्बेड केलेलं असतं. हे फिजिकल सिम सारखंच काम करतं, पण त्याचे काही फायदे आहेत.

  • Published by:  Suraj Sakunde
मुंबई, 21 सप्टेंबर: दूरसंचार आणि तंत्रज्ञान उद्योगात सध्या ई-सिमची मोठी चर्चा आहे. टेक कंपनी Apple नं काही दिवसांपूर्वी ई-सिम फीचरसह iPhone 14 सीरीज लाँच केली होती. वास्तविक या तंत्रज्ञानामध्ये तुमचा स्मार्ट फोन सिमकार्डशिवाय काम करेल. Apple नं iPhone 14 मधील SIM स्लॉट पर्याय काढून टाकला आहे. फिजिकल सिम कार्डच्या विपरीत ई-सिम डिव्हाइसमध्ये एम्बेड केलेलं असतं. हे फिजिकल सिम सारखंच काम करतं, पण त्याचे काही फायदे आहेत. उदाहरणार्थ ई-सिम एकापेक्षा जास्त सिम प्रोफाईल सेव्ह करू शकतं. ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त सिम कनेक्शन आहेत त्यांच्यासाठी ई-सिम सोयीचे आहे. ई-सिमचा आणखी एक फायदा म्हणजे ते बाहेर काढता येत नाही, त्यामुळे तोटा आणि चोरी झाल्यास त्याचा गैरवापर करता येत नाही. भारतातील खाजगी दूरसंचार ऑपरेटर कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ई-सिम प्रदान करत आहेत. खाली दिलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करून तुम्ही Airtel, Reliance Jio आणि Vodafone Idea नेटवर्कवरील स्मार्टफोन्ससाठी तुमचं प्रत्यक्ष सिम ई-सिममध्ये रूपांतरित करू शकता. रिलायन्स जिओ- रिलायन्स जिओ वापरकर्त्यांना त्यांच्या डिव्हाइसच्या सेटिंग्जमध्ये जावं लागेल आणि ई-सिम सेवा मिळविण्यासाठी 32-अंकी ईआयडी आणि 15-अंकी आयएमईआय क्रमांक नोंदवावा लागेल. यानंतर तुम्हाला 'GETESIM<space><32 अंक EID><space><15 अंक IMEI>' टाइप करून 199 वर संदेश पाठवावा लागेल. यानंतर एसएमएस आणि नोंदणीकृत ईमेल आयडीवर 19-अंकी व्हर्च्युअल ई-सिम क्रमांक प्राप्त होईल. आता 'SIMCHG <space><19 अंकी e-SIM number>' टाइप करून 199 वर एसएमएस पाठवावा लागेल. सुमारे दोन तासांनी ई-सिम रिक्वेस्ट प्रक्रिया केल्यानंतर कन्फर्मेशन संदेश येईल. हेही वाचा: DELAGE D12: कार आहे की फायटर जेट? 'या" कारचे Photo पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न एअरटेल- जर तुम्ही एअरटेल वापरकर्ता असाल, तर तुम्हाला प्रथम 'eSIM <space> Registered Email ID' टाइप करून 121 वर एसएमएस पाठवावा लागेल. यानंतर एक संदेश येईल, ज्याच्या प्रतिसादात तुम्हाला “1” पाठवून पुष्टी करावी लागेल की तुम्हाला ई-सिम वापरायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ओळखीची पुष्टी करण्यासाठी एअरटेलच्या प्रतिनिधीला कॉल करावा लागेल आणि ई-सिमचा QR कोड नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठवला जाईल. हा QR कोड स्कॅन केल्यानंतर, तुम्ही ई-सिम वापरण्यास सक्षम व्हाल. व्होडाफोन-आयडिया: Vi वापरकर्त्यांना त्यांच्या नंबरवरून 'eSIM<space>registered email ID' टाइप करून 199 वर संदेश पाठवावा लागेल. यानंतर, पुढील संदेशावर पुष्टीकरण दिल्यानंतर, नोंदणीकृत ईमेल आयडीवर वापरकर्त्यांना eSIM चा QR कोड पाठविला जाईल. या QR कोडच्या मदतीने, डिव्हाइसच्या नेटवर्क सेटिंग्जमध्ये जाऊन eSIM चा वापर सुरू केला जाऊ शकतो.
First published:

Tags: Sim

पुढील बातम्या