Home /News /technology /

स्टोरेज फुल झाल्याने स्लो झालाय फोन? या सोप्या ट्रिक्सने दूर होईल समस्या

स्टोरेज फुल झाल्याने स्लो झालाय फोन? या सोप्या ट्रिक्सने दूर होईल समस्या

android phone

android phone

बऱ्याच स्मार्टफोनला (Android Smartphones) पहिल्या काही महिन्यांनंतर एक समस्या जाणवते ती म्हणजे इंटर्नल मेमरी अर्थात इंटर्नल स्टोरेज फुल(Internal Storage) होण्याची. तर ही समस्या दुर करण्यासाठी जाणून घ्या काही उपाय...

  नवी दिल्ला, 25 ऑक्टोबर :  स्मार्टफोन हा जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. मात्र अनेकदा इंटरनल स्टोरेज फुल झाल्यास स्मार्टफोन स्लो होतो. तसेच फोन सतत हँग होण्यास सुरुवात होते. स्मार्टफोनमधील स्टोरेज कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्स जाणून घ्या.

  फोनची कॅश मेमरी क्लिअर करा

  फोनची कॅश मेमरीमध्ये अनेक गोष्टी या सेव्ह होत असतात. त्यामुळे अनेकदा फोनमधील स्टोरेज फुल होतं. अ‍ॅप्स आणि वेबसाईट लोडींगच्या वेळी जास्त डेटा कॅश होतो. अशावेळी फोनच्या सेटींगमध्ये जाऊन कॅश मेमरी डिलीट करून फोन मेमरी रिकामी करू शकता. Settings --> Storage & USB--> Internal Storage-->Cached Data अशा पद्धतीने तुम्ही फोनमधील स्टोरेज कमी करू शकता.

  स्मार्ट स्टोरेज टॉगल (Smart storage Toggle)

  हा पर्याय निवडल्यास तुमच्या फोनमधून बॅकअप घेतलेले फोटो 30, 60 किंवा 90 दिवसांनी आपोआप डिलीट केले जातात. जेव्हा स्टोरेज फुल होतं, तेव्हा बॅकअप घेतलेल्या फाइल्स आपोआप डिलीट होत असल्याने फोनच्या मेमरीवरचा भार कमी होतो.

  वापरत नसलेले अ‍ॅप्स डिलीट करा

  स्मार्टफोनमध्ये अनेक अनावश्यक किंवा वापर कमी असलेली अॅप्सही (Unused Apps) असतात. ती काढून टाकण्यासाठी Play Store उघडून 'माय अॅप्स अँड गेम्स' यावर जावं. टॉम मेनू लाइनमधून इन्स्टॉल पर्यायावर टॅप करावं. त्यातून लिस्ट फिल्टर करण्याचा पर्याय दिसतो. त्यात 'लास्ट यूज्ड'चा पर्याय दिसतो. जी अॅप्स सर्वांत जास्त वापरली गेली आहेत ती त्या लिस्टमध्ये सर्वांत वर दिसतात. त्या लिस्टमध्ये सर्वांत खाली असलेली अॅप्स तुम्ही जास्त वापरत नाही, असा अर्थ होतो. ती अॅप्स तुम्ही काढून टाकू शकता. स्टोरेजमधून अनावश्यक फाइल्स डिलीट करण्याचा एक पर्यायही उपलब्ध आहे. त्यासाठी स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये जावं. स्टोरेज हा पर्याय निवडावा. त्यानंतर फाइल कॅटेगरीची लिस्ट दिसेल आणि किती स्पेस शिल्लक आहे ते दिसेल. 'फ्री अप स्पेस' हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करावं. गुगलचं फाइल अॅप तुमच्या फोनवर असेल, तर 'रिमूव्ह आयटेम' (Remove Item) हा एक पर्याय तुम्हाला उपलब्ध होऊ शकेल. त्याचा वापर करून तुम्हाला बॅकअप घेतलेले फोटो, व्हिडिओ डिलीट करण्याचा पर्याय उपलब्ध होतो. डाउनलोड केलेल्या फाइल्स आणि कमी वापर असलेली अॅप्सही डिलीट करता येतात.
  First published:

  Tags: Phone, Phone battery, Smart phone, Smartphones

  पुढील बातम्या