मुंबई, 19 जुलै : सध्याच्या टेक्नोलॉजीच्या जगात कुणामुळे तुम्ही कधी अडचणीत याल याचा काही नेम नाही. त्यामुळे आपण सतर्क राहणे गरजेचं आहे. काही गोष्टी आपण तपासल्या पाहिजेत. जसं की, तुमच्या कागदपत्रांचा वापर करुन एकापेक्षा जास्त सिम खरेदी केल्याचे तुम्हालाही वाटत असेल, तर आता याबाबत तुम्ही माहिती मिळवू शकता आणि तुमच्या परवानगी शिवाय सुरु असलेले सिम कार्ड बंदही करू शकता. आता तुम्हाला वाटेल की ही प्रक्रिय किचकट असले, वेळखाऊ असेल. तर असं अजिबात नाही. हे सर्व तुम्ही घरबसल्या ऑनलाइन प्रक्रियेच्या मदतीने पूर्ण करू शकता. तर तुम्हाला काय करावं लागेल याबाबत सविस्तर माहिती घेऊयात. तुम्हाला माहित नसताना जर कुणी तुमच्या कागदपत्रांचा गैरवापर करुन सिमकार्ड वापरत असेल तर यासाठी भारतीय दूरसंचार विभागाने एक विशेष पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलच्या मदतीने हे कळू शकते की तुमच्या आयडीवर किती सिमकार्ड अॅक्टिव्हेट आहेत. तुमच्या आयडीवर तुमच्या नकळत दुसरे सिमकार्ड जारी केले असल्यास तुम्ही ते ब्लॉक करू शकता. सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार एक व्यक्ती 9 मोबाईल कनेक्शन घेऊ शकते. मात्र निवडक व्यक्तींव्यतिरिक्त, कोणीही स्वत:च्या नावावर इतके सिम घेत नाहीत. Google News: गुगल न्यूजवर आपल्या भाषेत बातम्या कशा वाचायच्या? प्रोसेस आहे खूपच सोपी तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत कसं तपासाल? » आधी (https://tafcop.dgtelecom.gov.in/alert.php) या पोर्टलवर लॉगिन करा. » त्यानंतर तुमचा नंबर टाका आणि पोर्टलवर OTP टाका. » आता तुम्हाला अॅक्टिव्ह कनेक्शनबद्दल माहिती दिसेल. » आता तुम्ही असे नंबर ब्लॉक करण्यासाठी रिक्वेस्ट पाठवू शकता, ज्याबद्दल तुम्हाला माहिती नाही. » रिक्वेस्ट केल्यानंतर, विभागाकडून एक तिकीट आयडी पाठवला जाईल जेणेकरून तुम्ही त्याचा मागोवा घेऊ शकता. » हा नंबर काही आठवड्यात बंद होईल. Electricity bill: वीजबिल येईल 3 हजार रुपयांनी कमी! ताबडतोब घरातून काढा ‘हे’ डिव्हाइस तुम्ही ही प्रक्रिया फॉलो केल्यास तुमच्या नावावर किती सिम रजिस्टर आहेत आणि किती सिमकार्ड तुम्हाला माहीत नाहीत हे तुम्ही सहज शोधू शकता. ही खूप महत्वाची माहिती आहे जी तुम्हाला आधी मिळू शकत नव्हती पण आता तुम्ही ही माहिती सहज मिळवू शकता. ही माहिती आता पोर्टलच्या माध्यमातून प्रत्येकाला उपलब्ध झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.