मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

‘या’ सेंटिंगद्वारे मुलांसाठी मोबाइल होईल सुरक्षित; मुलांना अयोग्य माहितीपासून दूर ठेवण्यासाठी होईल उपयोग

‘या’ सेंटिंगद्वारे मुलांसाठी मोबाइल होईल सुरक्षित; मुलांना अयोग्य माहितीपासून दूर ठेवण्यासाठी होईल उपयोग

पालकांनी मुलांवर लक्ष ठेवण्यासोबतच त्यांच्या मोबाइल वापरावर बंधनं घातली पाहिजेत.

पालकांनी मुलांवर लक्ष ठेवण्यासोबतच त्यांच्या मोबाइल वापरावर बंधनं घातली पाहिजेत.

पालकांनी मुलांवर लक्ष ठेवण्यासोबतच त्यांच्या मोबाइल वापरावर बंधनं घातली पाहिजेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • New Delhi, India

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : मोबाइल ही सध्याच्या काळात अन्न, पाण्याप्रमाणे गरजेची गोष्ट झाली आहे. हवं ते सगळं मोबाइलद्वारे करणं आता शक्य होतं. कोरोना महामारीमुळे लहान मुलांनाही मोबाइलची सवय झाली. अनेक लहान मुलांना तर मोबाइलचं व्यसन लागलं. मोबाइल व इंटरनेट सहज उपलब्ध झाल्यामुळे त्यांना अनेक गोष्टी एका क्लिकवर पाहायला मिळू लागल्या. याचे अनेक दुष्परिणामही जाणवू लागले.

पॉर्न व्हिडिओचं जग मुलांसमोर सहज उपलब्ध झालं. मुलं चुकीच्या मार्गाला लागण्याची शक्यता बळावली. त्यासाठी मुलांना मोबाइलपासून दूर ठेवलं पाहिजे. ते शक्य नसेल, तर मोबाइलमध्ये काही सेटिंग्ज करून अ‍ॅडल्ट कंटेंट ब्लॉक करता येऊ शकतो. मुलांच्या पॉर्न व्हिडिओ पाहण्याच्या व्यसनाचे गंभीर परिणाम समाजात दिसू लागले आहेत. हैदराबादमध्ये मंगळवारी (29 नोव्हेंबर) 5 किशोरवयीन मुलांना त्यांच्याबरोबर शिकणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.

हे सगळे विद्यार्थी शाळा सुटल्यावर त्या भागात फिरायचे व फोनवर अश्लील व्हिडिओ पाहायचे. त्या 5 विद्यार्थ्यांपैकी 4 विद्यार्थ्यांवर बलात्काराचा आरोप आहे, तर एका विद्यार्थ्यावर बलात्काराचा व्हिडिओ काढून तो व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर केल्याचा आरोप आहे, असं पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे. अशा प्रकारे अश्लील व्हिडिओ पाहण्याच्या व्यसनामुळे मुलांचं नुकसान होतं. त्यासाठी त्यांना वेळीच यापासून दूर केलं पाहिजे. पालकांनी मुलांवर लक्ष ठेवण्यासोबतच त्यांच्या मोबाइल वापरावर बंधनं घातली पाहिजेत. मोबाइलवर मुलं काय पाहतात, हे अनेकदा लक्षात येत नाही. फोनच्या सेटिंग्जमध्ये काही बदल करून अ‍ॅडल्ट कंटेंट मुलांसाठी ब्लॉक करता येतो.

अँड्रॉइड फोनमध्ये गुगल प्ले रिस्ट्रिक्शन ऑन करून मुलांसाठी फोन सुरक्षित करता येतो. यामुळे मुलांसाठी अयोग्य असलेली अ‍ॅप्स, गेम्स किंवा इतर काही मुलांना डाउनलोड करता येत नाही. त्यासाठी मुलं वापरतात त्या मोबाइलमधल्या गुगल प्ले स्टोअरवर जा. त्यात डाव्या कोपऱ्यात असलेल्या सेटिंग्जमध्ये जा. त्यात पॅरेंटल कंट्रोलचा पर्याय असतो. त्यात पिन सेट करता येतो. हा पिन सेट करून पालक पॅरेंटल कंट्रोलची सेटिंग्ज बदलू शकतात. त्यानंतर प्रत्येक विभागासाठी वयाची मर्यादा घालता येऊ शकते; मात्र तुमचा पिन मुलांना समजणार नाही, याची काळजी घ्यावी.

हेही वाचा - दोन मोबाईलमध्ये एक WhatsApp नंबर वापरता येणार; इंटरनेटचीही आवश्यकता नाही

अँड्रॉइड फोनवर गुगल सेफ सर्च ऑन करूनही मुलांना अयोग्य माहितीपासून दूर ठेवता येऊ शकतं. यामुळे मुलं गुगल क्रोम उघडतात, तेव्हा चुकूनही त्यांच्यासमोर अयोग्य माहिती येत नाही. हे सेटिंग करण्यासाठी गुगल क्रोमवर जावं. उजव्या बाजूला वर तीन ठिपके असलेलं बटण क्लिक करावं. त्यात असलेल्या पर्यायांमधला सेटिंग्जचा पर्याय उघडावा. अ‍ॅडव्हान्स्ड विभागात जाऊन प्रायव्हसी या पर्यायावर क्लिक करावं. तिथे सेफ ब्राउझिंग असं सेटिंग ऑन करता येतं. याशिवाय प्ले स्टोअरवर काही पॅरेंटल अ‍ॅप्सही असतात. त्याच्या मदतीने तुम्ही मुलांसाठी फोन सुरक्षित करू शकता.

First published:

Tags: Internet, Mobile, Smartphones