मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

सावधान! पेटीएम अ‍ॅपही घेते तुमची महत्त्वाची माहिती

सावधान! पेटीएम अ‍ॅपही घेते तुमची महत्त्वाची माहिती

पेटीएम अ‍ॅपचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी लोकांना व्हॉटसअ‍ॅप न वापरता, सिग्नल (Signal) हे अॅप वापरण्याचा सल्ला दिला आहे.

पेटीएम अ‍ॅपचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी लोकांना व्हॉटसअ‍ॅप न वापरता, सिग्नल (Signal) हे अॅप वापरण्याचा सल्ला दिला आहे.

पेटीएम अ‍ॅपचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी लोकांना व्हॉटसअ‍ॅप न वापरता, सिग्नल (Signal) हे अॅप वापरण्याचा सल्ला दिला आहे.

नवी दिल्ली, 15 जानेवारी : सध्या सोशल मीडियातील वेगवेगळ्या अ‍ॅप्सच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. संपर्कासाठी, फोटो, व्हिडिओच्या माध्यमातून हजारो, लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याचं स्वस्त आणि सोपं साधन म्हणून लोक व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम अशा विविध अ‍ॅप्सचा बिनदिक्कत वापर करत आहेत. सर्वत्र उपलब्ध झालेलं इंटरनेट, स्वस्त किंमतीतले स्मार्टफोन यामुळे तरुण पीढीच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकही व्हॉटसअ‍ॅपचा (WhatsApp)मोठया प्रमाणात वापर करत आहेत. या अ‍ॅप्सद्वारे युजर्सची वैयक्तिक माहिती गुप्त न राखता इतर कंपन्यांना दिली जात असल्याचा आरोप नेहमीच होत असतो. सध्या जगभरात लोकप्रिय असलेल्या व्हॉटसअ‍ॅपच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून, व्हॉटसअ‍ॅप वापरणं बंद करून नवीन अ‍ॅप वापरावेत असं आवाहन केलं जात आहे. आजतकनं दिलेल्या वृत्तानुसार, अलीकडेच चिनी कंपनी अलिबाबाचं (Alibaba) पाठबळ लाभलेल्या अग्रगण्य पेमेंट सेवा पुरवठादार कंपनी असलेल्या भारतातील पेटीएमनंही (Paytm)व्हॉटसअ‍ॅप न वापरण्याचं आवाहन केलं आहे. पेटीएम अ‍ॅपचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी लोकांना व्हॉटसअ‍ॅप न वापरता, सिग्नल (Signal) हे अॅप वापरण्याचा सल्ला दिला आहे. पेटीएम अ‍ॅपचे संस्थापक विजय शेखर शर्मा यापूर्वीही व्हॉटसअ‍ॅपच्या विरोधात बोलत आहेत. व्हॉटसअ‍ॅपनं जेव्हा पेमेंट सर्व्हिस आणण्याचा दावा केला होता, तेव्हा तर शर्मा यांच्या व्हॉटसअ‍ॅप विरोधाला अधिकच धार चढली होती. पेटीएमचा थेट स्पर्धक व्हॉटसअ‍ॅपच आहे, त्यामुळे विजय शर्मा त्यावर आरोप करत आहेत. त्यांनी व्हॉटसअ‍ॅप पेमेंट सुरक्षित असणार नाही, कारण यात लॉग इन, लॉग आऊटसारखी सुविधा नाही, असं म्हटलं होतं. पेटीएमचे सीईओ लोकांना व्हॉटसअ‍ॅप वापरू नका असं का सांगत आहेत ते यावरून सहज लक्षात येतं. लोकांच्या माहितीच्या सुरक्षेचा, गोपनीयतेच्या मुद्द्याचा विचार केला तर पेटीएम अशी माहिती गोळा करत नाही का? यावरही लक्ष देणं गरजेचं आहे. अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर अलीकडेच प्रायव्हसी लेबलची (Privacy Label)सुरुवात झाली आहे. अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरील कोणतंही अ‍ॅप सर्च करून ते तुमच्याकडून कोणकोणती माहिती घेतं, हे जाणून घेता येतं. अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरील पेटीएम अ‍ॅपचं प्रायव्हसी लेबल सर्च केलं तर हे लक्षात येईल की, पेटीएम अ‍ॅप युजरचे लोकेशन ट्रॅक करते. याशिवाय कॉन्टॅक्टस इन्फो आणि डिटेल्स तर पेटीएमकडं असतातच कारण याच माध्यमातून अकाऊंटस बनतात आणि तुम्ही पेमेंट करता. पेटीएम अ‍ॅपसाठी हा डेटा जमा केला जातो अ‍ॅप स्टोअरवर अलीकडेच प्रायव्हसी लेबलनुसार हे अ‍ॅप युजर्सची आर्थिक माहिती, लोकेशन, कॉन्टॅक्टस नंबर, नाव, कॉन्टॅक्टस आणि युजरचे फोटो, व्हिडिओ अशा माहितीही बघू शकते. पेटीएम अ‍ॅपवर सरकारबरोबर युजर्सची माहिती शेअर केल्याचा आरोप आहे. 2018 मध्ये कोब्रा पोस्ट स्टिंग ऑपरेशननंतर (Cobra post Sting Operation)पेटीएम सरकारला युजर्सची माहिती देत असल्याचा आरोप करण्यात आला होता. या स्टिंग ऑपरेशनमधील व्हिडिओत पेटीएमचे वरिष्ठ अधिकारी पेटीएम सरकारच्या कॅम्पेनचं प्रमोशन करत असल्याचं स्पष्टपणे म्हणत आहेत. कोब्रा पोस्ट स्टिंग ऑपरेशनमध्ये पेटीएमचे सीईओ विजय शेखर शर्मा यांच्या धाकट्या भावाचाही समावेश होता. यानंतर विरोधी पक्षांनी पेटीएमवर निशाणा साधला होता. पेटीएमनं त्या वेळी याबाबतीत एक निवेदन जारी केलं होतं. त्या निवेदनात पेटीएमनं स्पष्ट केलं होतं की, युजर्सचा डेटा शंभर टक्के सुरक्षित आहे. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांच्या विनंतीवरून त्यांना हा डेटा दिला जाऊ शकतो; मात्र याशिवाय अन्य कोणत्याही संस्थेबरोबर डेटा शेअर केला जात नाही. कोब्रा पोस्ट स्टिंग ऑपरेशननंतर पेटीएम सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत होते. विरोधी पक्षांनी पेटीएम वर अनेक आरोपही केले. राहुल गांधी यांनी तर ट्विटरवर पेटीएमला पे टू पीएम असंही म्हटलं होतं. व्हॉटसअ‍ॅप सरकारबरोबर डेटा शेअर करते का? व्हॉटसअ‍ॅप चॅटचा विचार केला तर, कंपनीचं म्हणणं आहे की युजर्सचे व्हॉटसअ‍ॅप चॅट कोणाबरोबरही शेअर केले जात नाहीत. व्हॉटसअ‍ॅप चॅटमध्ये एंड टू एंड एनक्रीप्शन आहे, त्यामुळे व्हॉटसअ‍ॅपच काय पण इतर कोणालाही ही माहिती मिळवता येत नाही. तंत्रज्ञान कंपन्या सरकारी संस्थाना त्यांच्या विनंतीवरून युजर्सचा मेटा डेटा देऊ शकतात. मेटा डेटा म्हणजे युजर्सची बेसिक माहिती असते. यात कम्युनिकेशन डेटा नसतो.
First published:

Tags: Paytm, Whats app news

पुढील बातम्या