मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /या राज्याचे मुख्यमंत्री सोडणार 4 गाड्यांचा VVIP Number, CM ने केली 0001 नंबर सोडण्याची घोषणा

या राज्याचे मुख्यमंत्री सोडणार 4 गाड्यांचा VVIP Number, CM ने केली 0001 नंबर सोडण्याची घोषणा

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) हे आपल्या ताफ्यातल्या चार गाड्यांचा व्हीआयपी नंबर (VIP Number) सोडणार आहेत. या चारही गाड्यांना ‘0001’ हा व्हीव्हीआयपी (VVIP) नंबर आहे.

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) हे आपल्या ताफ्यातल्या चार गाड्यांचा व्हीआयपी नंबर (VIP Number) सोडणार आहेत. या चारही गाड्यांना ‘0001’ हा व्हीव्हीआयपी (VVIP) नंबर आहे.

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) हे आपल्या ताफ्यातल्या चार गाड्यांचा व्हीआयपी नंबर (VIP Number) सोडणार आहेत. या चारही गाड्यांना ‘0001’ हा व्हीव्हीआयपी (VVIP) नंबर आहे.

    नवी दिल्ली, 6 एप्रिल : हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) हे आपल्या ताफ्यातल्या चार गाड्यांचा व्हीआयपी नंबर (VIP Number) सोडणार आहेत. या चारही गाड्यांना ‘0001’ हा व्हीव्हीआयपी (VVIP) नंबर आहे. हरियाणा मोटार वाहन नियम 1993 मध्ये सुधारणेबाबत मंत्रिमंडळाची चर्चा सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा (CM Khattar Announces) केली. मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय माध्यमांना सांगत असताना त्यांनी याबाबत माहिती दिली. आतापासून वाहनांचे सर्व व्हीव्हीआयपी नंबर सामान्य जनतेसाठी उपलब्ध होतील, असं त्यांनी जाहीर केलं.

    मुख्य सचिवांनीही सोडला व्हीआयपी नंबर

    मुख्यमंत्र्यांसोबतच हरियाणाचे मुख्य सचिव संजीव कौशल यांनीही आपल्या गाडीचा व्हीव्हीआयपी नंबर सोडण्याची घोषणा केली. यासोबतच ज्यांच्याकडे ‘0001’ नंबर आहे अशा सर्व सरकारी अधिकाऱ्यांना हा नंबर सोडावा लागणार आहे. अशा प्रकारे एकूण 179 सरकारी गाड्यांचे व्हीव्हीआयपी नंबर (Haryana Government VIP Numbers) जनतेसाठी खुले करण्यात आले आहेत. ई-ऑक्शनच्या (VIP Numbers E-auction) माध्यमातून सामान्य नागरिकही हे नंबर खरेदी करू शकतील, असं हरियाणा सरकारकडून जाहीर करण्यात आलं.

    सरकारी गाड्यांसाठी नवी सीरिज

    सरकारी गाड्यांची वेगळी ओळख असावी, यासाठी एचआर-जीओव्ही (HR-Gov) नावाची एक वेगळी नंबर सीरिज सुरू करण्याचा विचार हरियाणा सरकार (Haryana Government Decision) करत आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली. यामुळे सरकारी गाड्यांसाठी असणारे व्हीव्हीआयपी नंबर सर्वसामान्यांसाठी उपलब्ध (Haryana Government Car Numbers) होतील. तसंच सरकारी गाड्यांनाही नवीन सीरिज उपलब्ध होईल.

    हे वाचा - TCS चा कर्मचारी झाला Zomato डिलीव्हरी बॉय, शेअर केला Food Delivery वेळी येणाऱ्या अडचणींचा अनुभव

    नंबरप्लेटमधून कमावणार पैसा

    सरकारी गाड्यांचे नंबर आता ई-लिलावाच्या माध्यमातून सामान्य जनतेलाही खरेदी करता येणार आहेत. खट्टर म्हणाले, की राज्यात अशा 179 व्हीव्हीआयपी नंबर्सच्या गाड्या आहेत. काही नंबर्सची किंमत 5 लाख रुपये, तर काहींची 10 लाख रुपये आहे. या 179 गाड्यांच्या नंबर खरेदीमधून सुमारे 18 कोटी रुपये राज्य सरकारला मिळतील असा अंदाज मुख्यमंत्र्यांनी (Haryana CM Decision) या वेळी वर्तवला. नंबर्सच्या माध्यमातून उपलब्ध झालेला हा पैसा जनतेच्या विकासकामांसाठी वापरण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितलं.

    ग्रीन हायड्रोजन उत्पादनाची सुरुवात

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केंद्रशासित प्रदेशांमध्ये (NCR) ग्रीन टेक्नॉलॉजीवर चालणाऱ्या गाड्या अधिकाधिक वापरण्याची संकल्पना मांडली आहे. या मोहिमेसाठी फरीदाबादच्या एका कंपनीने ग्रीन हायड्रोजनचं (CM Khattar on Green Hydrogen) उत्पादन सुरू केलं असल्याची माहिती मुख्यमंत्री खट्टर यांनी या वेळी दिली.

    First published:
    top videos

      Tags: Car, Haryana