मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Ganesh Chaturthi Offers 2022: स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करायचाय? ‘ही’ कंपनी देत आहे बंपर ऑफर

Ganesh Chaturthi Offers 2022: स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करायचाय? ‘ही’ कंपनी देत आहे बंपर ऑफर

स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करायचाय? ‘ही’ कंपनी देत आहे बंपर ऑफर

स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करायचाय? ‘ही’ कंपनी देत आहे बंपर ऑफर

Ganesh Chaturthi Offers 2022: गणेश चतुर्थीच्या निमित्तानं Vivoने एक खास ऑफर जाहीर केली आहे. तुम्हाला कंपनीकडून अनेक फोनवर कॅशबॅक आणि इतर ऑफर्स मिळत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 1 सप्टेंबर: जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही Vivo च्या ऑफरचा  (Discount offers on Vivo Smartphones) फायदा घेऊ शकता. विवोनं गणेश चतुर्थीच्या निमित्तानं आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. याचा फायदा घेऊन तुम्ही परवडणाऱ्या किमतीत स्मार्टफोन खरेदी करू शकता. या सेलमध्ये तुम्ही Vivo V25 Pro, Vivo X80 सीरीज आणि Vivo Y75 खास सवलतीत खरेदी करू शकता.

या स्मार्टफोन्समध्ये तुम्हाला नवीनतम तंत्रज्ञान आणि उद्योगातील आघाडीची वैशिष्ट्ये मिळतील. तुम्हाला Vivo V25 Pro मध्ये कलर चेंजिंग टेक्नोलॉजी मिळेल. दुसरीकडे, व्यावसायिक फोटोग्राफीसाठी तुम्ही Vivo X80 सीरिज खरेदी करू शकता. या सेलमध्ये उपलब्ध असलेल्या ऑफर्सची माहिती जाणून घेऊया.

काय आहेत ऑफर?

Vivo X80 मालिकेवर गणेश चतुर्थी ऑफर अंतर्गत तुम्हाला 4000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. दुसरीकडे, तुम्हाला Vivo V25 Pro वर 3,500 रुपयांची सूट मिळेल. ही सवलत कॅशबॅकच्या स्वरूपातही मिळणार आहे.

तुम्ही 1500 रुपयांच्या कॅशबॅकवर सर्वात स्वस्त म्हणजेच Vivo Y75 स्मार्टफोन खरेदी करण्यास सक्षम असाल. सेल अंतर्गत, कॅशबॅकचा लाभ ICICI बँक कार्ड, कोटक महिंद्रा बँक आणि SBI बँक क्रेडिट कार्डवर उपलब्ध असेल. या ऑफर 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत वैध आहेत.

हेही वाचा:

या स्मार्टफोन्समध्ये काय खास आहे?

Vivo V25 Pro मध्ये तुम्हाला कलर चेंजिंग रियर पॅनल मिळेल. फोनमध्ये 64MP मुख्य लेन्ससह OIS नाईट कॅमेरा, 120Hz रिफ्रेश रेटसह 3D कर्व्ह ग्लास डिस्प्ले आणि 32MP Eye AF सेल्फी कॅमेरा मिळेल. Vivo Y75 या वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च झाला होता. हँडसेट प्रीमियम बिल्ड गुणवत्ता आणि डिझाइनसह येतो. यामध्ये MediaTek Helio G96 चिपसेट देण्यात आला आहे. हँडसेटमध्ये 50MP सुपर नाईट कॅमेरा आणि 44MP AF सेल्फी कॅमेरा आहे.

कंपनीच्या फ्लॅगशिप सीरीज म्हणजेच Vivo X80 सीरिज वर ऑफर देखील आहे. या मालिकेत तुम्हाला ZEISS Gimbal पोर्ट्रेट कॅमेरा मिळतो. यात MediaTek Dimensity 9000 प्रोसेसर, 50MP अल्ट्रा-सेन्सिंग IMX866 प्रोसेसर आहे. यात V1+ चिप देखील आहे, जी तुम्हाला सर्वोत्तम फोटोग्राफीमध्ये मदत करेल.

First published:

Tags: Smartphones