मुंबई, 26 मे : लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर जुना झाला की त्याचा वेग कमी होऊ लागतो. याचं मुख्य कारण म्हणजे आपण सॉफ्टवेअर अपडेट करतो. परंतु, हार्डवेअर कालांतराने जुने होत जाते. सोप्या भाषेत सांगायचे तर नवीन सॉफ्टवेअर जुन्या हार्डवेअरमध्ये चालवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत, बरेच लोक कामाच्या मध्येच आपला लॅपटॉप वारंवार रीफ्रेश करतात किंवा पुन्हा सुरू करतात. आणि असे केल्याने बराच वेळ वाया जातो. मात्र, तुमचा हा वेळ वाचण्याची ट्रीक आम्ही सांगणार आहोत.
आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण होत असेल की याला टाळण्याचा उपाय काय? म्हणून आम्ही तुम्हाला एक सोपी युक्ती (Easy Laptop Hacks) सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही काम करताना तुमच्या कॉम्प्युटर-लॅपटॉपचा स्पीड वाढवू शकता. आणि यासाठी तुम्हाला फक्त एक सेकंद लागेल. तर जाणून घेऊया.
कीबोर्डची ही युक्ती समजून घ्या
जर तुम्ही विंडोज लॅपटॉप किंवा पीसी वापरत असाल तर तुम्हाला शॉर्टकट रीबूट सिस्टमचे ज्ञान असणे आवश्यक आहे. हा कीबोर्डवरील काही बटणांचा पॅटर्न आहे जो दाबल्यावर तुमचा संगणक एका सेकंदात वेगवान होतो. जेव्हा जेव्हा तुम्हाला असे वाटत असेल की संगणक खूप स्लो चालू आहे किंवा ऍप्लिकेशन्स पुन्हा पुन्हा फ्रीज होत आहेत, तर तुम्ही ही युक्ती वापरू शकता.
वाचा - AC फिल्टर एवढ्या दिवसात करा स्वच्छ, अन्यथा कूलिंग होईल कमी अन् वाढेल उष्णता
तुम्हाला तुमच्या संगणकाच्या किंवा लॅपटॉपच्या कीबोर्डवर 'Shift, Ctrl, Windows आणि B' की एकाच वेळी दाबाव्या लागतील. यासाठी तुम्ही प्रथम Shift, नंतर Ctrl, नंतर Windows आणि शेवटी B दाबा. लक्षात ठेवा बटण दाबताना, मागील बटणावरून बोट उचलू नका. जेव्हा सर्व बटणे दाबली जातात तेव्हाच बोटे काढा.
असे केल्याने तुमच्या लॅपटॉपमधील सर्व महत्त्वाचे ड्रायव्हर्स रीस्टार्ट आणि रिफ्रेश होतील आणि तुमचा लॅपटॉप सुरळीत चालू होईल. जेव्हाही तुमचा लॅपटॉप स्लो होतो तेव्हा तुम्ही या सोप्या युक्तीचा अवलंब करून ते जलद बनवू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Laptop