Home /News /technology /

या दिवाळीत OnePlus Nord 2 5G आणि Nord CE 5G वर मिळवा जबरदस्त डिस्काउंट!

या दिवाळीत OnePlus Nord 2 5G आणि Nord CE 5G वर मिळवा जबरदस्त डिस्काउंट!

OnePlus Nord 2 5G and Nord CE 5G : उत्सव काळात या मोबाईल तुम्हाला मोठी सूट मिळणार आहे. या फोनवर सध्या उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम ऑफर येथे दिलेल्या आहेत.

  OnePlus चे OnePlus Nord 2 5G आणि Nord CE 5G  हे सर्वोत्तम फोन आहेत. अतिशय चांगल्या किंमतीत फोनमध्ये सर्वोत्तम हार्डवेअर उपलब्ध आहे. तसेच जबरदस्त डिझाईन, मोठा डिस्प्ले, आणि चांगला कॅमेराही या फोनमध्ये उपलब्ध आहे. जर तुम्हाला 30 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीतील फोन हवा असेल, तर हे फोन सर्वोत्तम आहेत.

  Nord 2: फ्लॅगशिप लूक्स, आणि पॉवर

  32 MP सेल्फी कॅमेरा आणि 50 MP आयएमएक्स 766  बेस्ड मागील कॅमेरासह मीडियाटेक डायमेन्सिटी 1200-AI चिप असणारा नॉर्ड 2 हा एक फोन आहे. मागील कॅमेरा 8 MP अल्ट्रा-वाइड आणि 2 MP मॅक्रो आणि वाइड आणि अल्ट्रा-वाइड सपोर्ट नाईट मोडसह जोडलेला आहे. ते दिवसाच्या प्रकाशात उत्कृष्ट आहेत आणि व्हिडिओ शूटिंगसाठीही उत्तम आहेत. या मोबाईलमध्ये 6.43-इंच 90 हर्ट्झ, एचडीआर 10-रेटेड AMOLED फ्रंट ग्रेस आणि 4,500 mAh बॅटरी असते, ज्याची चार्जिंग पॉवर 65 W आहे. त्यामुळे 30 मिनीटांत बॅटरी पूर्ण चार्ज होते साधारणपणे 8/128 GB व्हेरिएंटचा मोबाईल 30 हजार रुपयांपर्यंत मिळतो, आणि 12/256 GB व्हेरिएंटसाठी 5 हजार रुपये अधिक लागतात. पण आता उत्सव काळात या मोबाईल तुम्हाला मोठी सूट मिळणार आहे. या फोनवर सध्या उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम ऑफर येथे दिलेल्या आहेत. 12/256 मॉडेलवर 1,000 रुपयांचे फेस्टिव्ह स्पेशल प्राईस कूपन उपलब्ध आहे. हे कूपन निवडक रिटेल स्टोअरवर नोव्हेंबरपर्यंत वापरता येईल. OnePlus.in वर खरेदी करून SBI द्वारे ऑनलाईन पेमेंट केल्यास 1,500 रुपयांची कॅशबॅक ऑफर मिळेल. SBI वर 3-6 महिन्यांचा नो-कॉस्ट ईएमआय पर्यायही उपलब्ध आहे.  iOS डिव्हाइस एक्स्चेंज केल्यास Nord 2 5G वर तुम्हाला 1,000 रुपये अतिरिक्त सूट मिळेल.

  Nord CE 5G: पूर्णपणे OnePlus चा अनुभव प्रदान करते

  CE चा मोबाईल Nord 2 पेक्षा 5 हजारांनी स्वस्त आहे, पण तरीही डिझाईन आणि परफॉर्मन्समध्ये कुठेही कमी नाही. या मोबाईलमध्ये तुम्हाला पॉवरफूल Snapdragon 750G मिळते, जे गेमिंगसाठी जबरदस्त आहे. हा मोबाईल Nord 2 प्रमाणेच 8/128 GB आणि 12/256 GB या दोन्ही मेमरी आणि स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. मोबाईलमध्ये 16 MP सेल्फी कॅमेरा आणि 64 एमपी मागील कॅमेरा आहे, जो 8 एमपी अल्ट्रा-वाइड आणि 2 एमपी मॅक्रोसह जोडलेला आहे. आणि या मोबाईलची बॅटरी क्षमता 4,500 mAh आहे. तसेच 30 W चे फास्ट-चार्जर डिव्हाईसही उपलब्ध आहे, ज्याची स्पीडही उत्तम आहे. या सर्व गोष्टींसह खालील उपलब्ध ऑफर्समुळे हा मोबाईल विकत घेण्याचा मोह तुम्हाला आवरणार नाही: SBI ची 3-6 महिन्यांची नो-कॉस्ट EMI ऑफर उपलब्ध आहे. ही ऑफर निवडक स्टोअर आणि OnePlus.in वर केलेल्या खरेदीसाठी उपलब्ध आहे. तसेच 1,000 रुपयांचा त्वरित बॅक डिस्काउंटही मिळेल. Amazon वर खरेदी केल्यास, HDFC वर वरील EMI प्लॅन उपलब्ध आहे. तसेच 2,000 रुपयांचा त्वरित बॅंक डिस्काउंटही उपलब्ध आहे. तसेच जुन्या iOS डिव्हाईसच्या एक्स्चेंजवर तुम्हाला अतिरिक्त 1,000 रुपये डिस्काउंट मिळेल. 
  First published:

  Tags: One plus 9

  पुढील बातम्या