नवी दिल्ली, 14 एप्रिल : आजही देशभरातील अनेक गावांत वीज पोहचलेली नाही. सध्यातर कोळसा संकटामुळे अनेक राज्यांमध्ये वीज टंचाईचं संकट उभं राहिलं आहे. विजेची समस्या असलेल्या आरोग्य केंद्रांमध्ये विजेअभावी काही वेळा औषधे व लसी खराब होतात. या समस्येवर उपाय शोधला आहे बी.टेक.च्या विद्यार्थ्याने. ही समस्या सोडवण्यासाठी अॅक्सिस कॉलेज कानपूरचा बी.टेक तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी समरजित सिंग याने विजेशिवाय चालणारा रेफ्रिजरेटर बनवला आहे. आता विजेशिवाय चालणारा असा फ्रीज आरोग्य केंद्रांसाठी वरदान ठरणार आहे. वीज नसलेल्या ठिकाणीही रेफ्रिजरेटर चालेल सौरऊर्जेवर चालणारे रेफ्रिजरेटर जीवरक्षक औषधे आणि लस सुरक्षित ठेवू शकतो. समरजीतने त्याच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे. समरजित सिंह म्हणाला की, पर्यावरण रक्षणात महत्त्वाची भूमिका बजावणारी सौरऊर्जा आता ग्रामीण रुग्णालयांमध्ये जीव वाचवणारी औषधे वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. जिथे वीज आणि इतर संसाधनांची समस्या आहे, त्या भागात रेफ्रिजरेटर्स सौरऊर्जेने चालवता येऊ शकतो. कंप्रेसरऐवजी थर्मो इलेक्ट्रिक समरजीतने एक सोलर रेफ्रिजरेटर बनवले आहे आणि तो फक्त एक प्रोटोटाइप आहे. यामध्ये कंप्रेसरचा वापर केला जात नाही. त्यात सोलर प्लेट असून एक बॅटरी देखील वापरली आहे. कंप्रेसरऐवजी थर्मो इलेक्ट्रिकचा वापर करण्यात आला आहे. सप्लाय दिल्यानंतर त्यात तापमानाचा फरक निर्माण होईल आणि त्यानंतर तापमानात घट होईल. ALERT! लाखो अँड्रॉइड स्मार्टफोन्स धोक्यात, हॅकर्सकडून मीडिया फाइल्सचा आधार 4 तास चार्जिंगनंतर 12 तास उर्जा त्याने सांगितले की 4 तासांच्या सोलर पॅनेलने चार्ज केल्यानंतर रेफ्रिजरेटर सुमारे 12 तास चालेल. यात एक अतिरिक्त बॅटरी आहे, जी सोलर डिस्चार्ज झाल्यावरही हे काम करेल. हे पूर्णपणे इको फ्रेंडली आहे. किती खर्च आला? सध्या त्याची क्षमता 5 लिटर आहे आणि त्याचे वजनही खूप कमी आहे. वजन कमी असल्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे सोपे होईल. रेफ्रिजरेटर चालवण्यासाठी सप्लायची आवश्यक नाही. ते तयार करण्यासाठी सुमारे 3000 ते 3500 रुपये खर्च आल्याचे त्याने सांगितले. सैनिकांसाठी उपयुक्त दुर्गम भागात तैनात असलेल्या सैनिकांसाठीही सौर पॅनेलवर चालणारे रेफ्रिजरेटर उपयुक्त ठरेल, असे समरजीत याने सांगितले. सैनिकांना थंड पाणी आणि सुरक्षित अन्न मिळेल. या रेफ्रिजरेटरमध्ये खाद्यपदार्थ आणि पेये सुरक्षित ठेवता येतात. इंजेक्शन आणि औषधे देखील सैनिकांसाठी सुरक्षित ठेवता येतील. हे अतिशय चांगलं इनोवेशन असल्याचे महाविद्यालयाचे संचालक डॉ. आशिष मलिक यांनी सांगितले. वीज खर्च न करता वैद्यकीय आणि लष्करी क्षेत्रासाठी उपयुक्त ठरू शकते. हे खूप देखील स्वस्त आहे. सौरऊर्जेला चालना देणारा हा शोध आहे. देवरियाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज जैन यांनी सांगितले की, ग्रामीण भागात विजेची कमतरता असल्याने अशा प्रकारच्या रेफ्रिजरेटरची नितांत गरज आहे. लस आणि इतर औषधे देखील सुरक्षित तापमानात ठेवणे आवश्यक आहे. त्यांच्या देखभालीमध्ये बरेच मनुष्यबळ आणि ऊर्जा वाया जाते. येथे, नवीन रेफ्रिजरेटरमध्ये तापमानाचे निरीक्षण करण्यासाठी चिप्स आहेत. हे रेफ्रिजरेटर आल्याने ग्रामीण आरोग्य केंद्रांमधील सुविधांमध्ये वाढ होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.