Home /News /technology /

ऑफिसमध्ये काम करताना अचानक खिशात OnePlus Nord 2 चा झाला स्फोट, कंपनी म्हणते

ऑफिसमध्ये काम करताना अचानक खिशात OnePlus Nord 2 चा झाला स्फोट, कंपनी म्हणते

स्फोट झाल्यामुळं माझे शरीर भाजले आहे आणि स्फोटाच्या वेळी निर्माण झालेल्या धुरामुळे मला अजूनही श्वास घेण्यास त्रास होत आहे, असे त्याचे म्हणणे आहे.

    नवी दिल्ली, 12 सप्टेंबर : सोशल मीडियावर एका युजरने OnePlus Nord 2 स्मार्टफोनचा स्फोच झाल्याचा दावा केला आहे. ऑफिसमध्ये काम करत असताना त्याला अचानक खिशामध्ये गरम काहीतरी होत असल्याचे जाणवले. त्याने ताबडतोब खिशात पाहिले असता धूर येत असल्याचे दिसले. त्यावर त्यानं तत्काळ आपले जॅकेट काढून फेकून दिले. हा स्फोट कशामुळे झाला याची माहिती घेण्यासाठी कंपनीकडून या युजरला फोन देण्याची मागणी करण्यात आली, मात्र त्याने कंपनीला फोन देण्यास नकार दिला आहे. काम करत असताना झाला स्फोट गौरव गुलाटी नावाच्या एका व्यक्तीने सोशल मीडियावर हा दावा केला आहे. ऑफिसमध्ये काम करत असताना हा स्फोट झाल्याचे त्याने सांगितले. स्फोट झाल्यामुळं माझे शरीर भाजले आहे आणि स्फोटाच्या वेळी निर्माण झालेल्या धुरामुळे मला अजूनही श्वास घेण्यास त्रास होत आहे, असे त्याचे म्हणणे आहे. झालेल्या प्रकारामुळे मला मोठा धक्का बसला आहे. मी लवकरच या बाबत मीडियाशी बोलणार आहे. हा स्मार्टफोन ज्यांच्या कुणाकडे आहे त्यांनी कृपया काळजी घ्यावी. घडलेल्या प्रकारामुळे मला ऐकू येणे आणि दिसण्याचाही त्रास जाणवू लागला आहे, असे त्याचे म्हणणे आहे. तपासणी केल्याशिवाय नुकसान भरपाई मिळणार नाही दुसरीकडे वन प्लस कंपनीने याबाबत माहिती देताना सांगितले की, कोणत्याही ग्राहकाची अशी तक्रार आम्ही फार गांभीर्याने घेतो. वन प्लसच्या प्रवक्त्याने सांगितले की, काही दिवसांपूर्वी एका युजरने वन प्लस नोर्ड 2 चा स्फोट झाल्याची तक्रार आमच्याकडे केली होती. त्यानंतर कंपनीकडून आमचे एक पथक या व्यक्तीने केलेल्या तक्रारीची खातरजमा करण्यासाठी पोहोचले. त्याने दिलेल्या पत्त्यावर पोहोचून देखील आणि अनेकदा त्याच्याकडे फोनची मागणी करून देखील त्याने आम्हाला स्मार्टफोन तपासणीसाठी दिला नाही. त्यामुळे स्फोटाची खातरजमा केल्याशिवाय आम्ही कोणतीही नुकसानभरपाई देऊ शकत नाही, असे म्हटले आहे. हे वाचा - आणखी एक बळी! अमरावतीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यानं पीडितेने उचललं भयावह पाऊल दरम्यान, गेल्या महिन्यात आणखी एका युजरने त्याच्या ट्विटमध्ये वनप्लस नॉर्ड 2 स्फोट झाल्याचा दावा केला होता आणि नंतर कथितरीत्या स्फोट झालेल्या डिव्हाइसचे कोणतेही चित्र अपलोड न करता पोस्ट हटवली गेली. कंपनीने नंतर हा दावा फेटाळून लावला आणि तपासात हे प्रकरण खोटे असल्याचे उघड झाले आणि वनप्लसची कोणतेच उत्पादन त्याच्याकडे नसल्याचे समजले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Oneplus, Smart phone

    पुढील बातम्या