Home /News /technology /

डिस्काउंट ऑफरमध्ये मिळतोय OnePlus चा 'हा' 5G स्मार्टफोन, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

डिस्काउंट ऑफरमध्ये मिळतोय OnePlus चा 'हा' 5G स्मार्टफोन, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

वनप्लस नॉर्ड 2 5जीमध्ये (OnePlus Nord 2) अनेक लेटेस्ट फीचर्स आहेत. फोनमध्ये 6.43 इंचाचा फुल एचडी प्लस फ्लुइड AMOLED डिस्प्ले आहे

नवी दिल्ली 06 डिसेंबर : सध्याच्या 'हार्ड अँड फास्ट' युगामध्ये आज उदयाला आलेली टेक्नॉलॉजी (Technology) काही दिवसातच आउटडेटेड वाटू लागते. आपल्या हातामध्ये एकदम लेटेस्ट टेक्नॉलॉजी असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. हीच गोष्ट लक्षात घेऊन विविध स्मार्टफोन (Smartphone) निर्मात्या कंपन्या सातत्यानं आपल्या प्रॉडक्टमध्ये बदल करतात. सध्या मार्केटमध्ये स्मार्टफोन कंपन्यांची जोरदार स्पर्धा आहे. ग्राहकांना चांगल्या बजेटमध्ये जास्तीत जास्त फीचर्स असलेले फोन देण्याचा प्रयत्न प्रत्येक कंपनी करत असल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून वन प्लसचे (OnePlus) स्मार्टफोन्स मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. कंपनीनं चांगली फीचर्स असलेले फोन बजेट रेंजमध्ये उपलब्ध करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे जर तुम्हाला वन प्लसच्या फोनवर चांगली डिस्काउंट ऑफर मिळाली तर तुम्हाला आनंद होईल, यात शंका नाही. वन प्लस कंपनीनं आपला नॉर्ड 2 5G फोन (OnePlus Nord 2 5G) सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिला आहे. या अप्रतिम फोनवर सध्या कोणत्या ऑफर्स उपलब्ध आहेत आणि या फोनचे स्पेसिफिकेशन्स कसे आहेत याबाबत आपण माहिती घेऊया…. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर ग्राहकांनी वन प्लस नॉर्ड 2 5G हा फोन अमेझॉन (Amazon.in) आणि वन प्लस (OnePlus.in) साईटवरून खरेदी करण्यासाठी आयसीआयसीआय (ICICI) बँकेचं कार्ड वापरलं तर त्यांना 2 हजार रुपयांची सूट मिळेल. ही ऑफर लाइव्ह असून ग्राहकांना 31 डिसेंबर 2021पर्यंत या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. वन प्लसनं आपला हा फोन जुलैमध्ये लाँच केला होता. वनप्लस नॉर्ड 2 हा फोन, 6जीबी प्लस 128जीबी, 8जीबी प्लस 128जीबी आणि 12जीबी प्लस 256जीबी स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. यापैकी 6जीबी रॅम (RAM) असलेला व्हेरियंट एक्सक्लुजीव्हली OnePlus.in वर उपलब्ध आहे. तर, 8जीबी प्लस 128 जीबी आणि 12जीबी प्लस 256 जीबी व्हेरियंट वनप्लस साईट आणि अमेझॉन दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहेत. वनप्लस नॉर्ड 2 5जीमध्ये (OnePlus Nord 2) अनेक लेटेस्ट फीचर्स आहेत. फोनमध्ये 6.43 इंचाचा फुल एचडी प्लस फ्लुइड AMOLED डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचं रिझोल्यूशन 1080×2400 पिक्सेल इतकं असून रीफ्रेश रेट 90Hz आहे. फोनमध्ये मीडिया टेक (MediaTek) Dimensity 1200-AI प्रोसेसर असून 12 जीबी रॅम आणि 256 जीबीपर्यंत स्टोरेज क्षमता आहे. Android 11वर आधारित असलेला हा फोन ऑक्सिजन OS 11.3 वर काम करतो. 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा या फोनमध्ये एकदम दमदार ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. त्यात, 50 मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सेलचा सेंकंडरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सेल मोनोक्रोम सेन्सर आहे. सेल्फीसाठी, 32-मेगापिक्सलचा Sony IMX615 फ्रंट कॅमेरा आहे. या फ्रंट कॅमेरामध्ये ईआयएस (EIS) सपोर्ट उपलब्ध आहे. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि यूएसबी टाइप सी पोर्टसह हा फोन मिळतो. पॉवरसाठी, फोनमध्ये 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4500 mAh ची बॅटरी आहे. जर तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर वनप्लसचा नॉर्ड 2 5जी फोनचा विचार करण्यास हरकत नाही.
First published:

Tags: Oneplus, Smartphones

पुढील बातम्या