Home /News /technology /

फक्त 60 रुपयांमध्ये मिळतोय फ्रिज,वाशिंग मशीन ;15 नोव्हेंबरपर्यंत आहे स्कीम!

फक्त 60 रुपयांमध्ये मिळतोय फ्रिज,वाशिंग मशीन ;15 नोव्हेंबरपर्यंत आहे स्कीम!

कंपनीने 'सोच के बनाया है' या थीम अंतर्गत ही योजना सुरू केलीये.

    01 आॅक्टोबर : सण-उत्सवाच्या महिन्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळेच सण-उत्सवाच्या दिवशी घरात कोणती तरी वस्तू आणली पाहिजे असा सर्वांचा हेतू असतो. जर तुम्ही टीव्ही, फ्रिज, वाशिंग मशीन खरेदी करण्याच्या विचार करत असाल तर गोदरेज तुमच्यासाठी खास आॅफर घेऊन आलंय. गोदरेज एप्लान्सेस् आपला 60 वा वर्धापन दिवस साजरा करतोय. त्यानिमित्ताने गोदरेजने आपल्या ग्राहकांना खास भेट दिलीये. ग्राहकांसाठी गोदरेजने खास स्किम सुरू केलीये. या स्किमच्या अंतर्गत तुम्ही फक्त 60 रुपये देऊन गोदरजेचे कोणतेही प्रीमियम उत्पादन खरेदी करू शकतात. बाकीची रक्कम ही विना व्याज ईएमआयने फेडू शकतात. वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने 'सोच के बनाया है' या थीम अंतर्गत ही योजना सुरू केलीये. कंपनीने या फेस्टिव्हल हंगामाता 30 टक्के उत्पादन विक्री वाढवण्याचा इरादा केलाय. ही आॅफर 1 आॅक्टोबरपासून ते 15 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. नव्या आॅफरनुसार कंपनीने रेफ्रिजरेटरचे 32 माॅडल बाजारात उतरवले आहे. वाशिंग मशीनचेही 10 माॅडल लाँच केले आहे. सोबतच एसी आणि मायक्रोवेवही आणले आहे. ग्राहकांना उत्पादनाच्या किंमतीतून फक्त 60 रुपये देऊन उत्पादन घरी घेऊन जाऊ शकतात. 60 रुपये हे डाऊनपेमेंट म्हणून स्वीराकारले जाणार आहे. यासोबत कंपनीने अन्य उत्पादनावर फायन्सस आॅफर दिल्या आहेत. यात फ्रिज, वाशिंग मशीन, मायक्रोवेव फक्त 999 रुपयामध्ये खरेदी करता येईल. एसी आणि चेस्ट फ्रीजरवर 2499 रुपये डाऊनपेमेंट असणार आहे. माइक्रोवेव खरेदीवर मोफत वस्तू कंपनीने प्रत्येक मायक्रोवेव ओवनच्या खरेदीवर 999 रुपये किंमतीचा ट्रियो बाऊल मोफत देणार आहे. गोदरेजचे उत्पादन खरेदीवर स्लून वाऊचर, मील वाऊचर तसेच हाॅलिडे पॅकेजही मिळणार आहे. ========================================== लष्कराची बुलेटवर चित्तथरारक प्रात्यक्षिकं, पाहून थक्क व्हाल : VIDEO
    First published:

    पुढील बातम्या