• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • 2 लाखांची Royal Enfield मिळतेय अर्ध्याहून कमी किंमतीत, अशी विकत घेता येणार!

2 लाखांची Royal Enfield मिळतेय अर्ध्याहून कमी किंमतीत, अशी विकत घेता येणार!

आपल्याकडे बुलेट (Bullet) असावी आणि त्या बुलेटवरुन आपण दूरवर रुबाबात भटकंती करावी, असं बाईकर्सचं स्वप्न असतं. पण रॉयल एनफिल्डसारख्या (Royal Enfield) उत्तम कंपनीच्या बाईक्सची किंमत पाहता, प्रत्येकाचं हे स्वप्न पूर्ण होतचं असं नाही.

  • Share this:
मुंबई, 27 जुलै : आपल्याकडे बुलेट (Bullet) असावी आणि त्या बुलेटवरुन आपण दूरवर रुबाबात भटकंती करावी, असं बाईकर्सचं स्वप्न असतं. पण रॉयल एनफिल्डसारख्या (Royal Enfield) उत्तम कंपनीच्या बाईक्सची किंमत पाहता, प्रत्येकाचं हे स्वप्न पूर्ण होतचं असं नाही. अशावेळी स्वप्नपूर्ती करता, सेकंड हँड बाईकचा (Second Hand Bike) पर्याय समोर येतो. आज अनेक वेबसाइटसवर अशा प्रकारच्या लग्झरी बाईक्स अत्यंत वाजवी किंमतीत उपलब्ध आहेत, त्यामुळे बुलेटचे स्वप्नही साकार होण्यास काहीच हरकत नाही. रॉयल एनफिल्ड कंपनीने क्लासिक 350 (Classic 350) बाईक अपडेट केल्यानंतर या बाईकची युवावर्गात मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक लोक ही बाईक खरेदी करु इच्छित आहेत. परंतु, या बाईकची एक्स शोरुम किंमत 2 लाख रुपये असल्याने अनेकांना ही बाईक खरेदी करणं शक्य होत नाही. परंतु, Droom सारख्या काही वेबसाइटसवर तुम्हाला रॉयल एनफिल्ड सारख्या लग्झरी सेकंड हँड बाईक चांगल्या कंडिशनमध्ये मिळू शकतात आणि विशेष म्हणजे त्याही कमी किमतीत. जाणून घेऊया रॉयल एनफिल्डच्या क्लासिक 350 बाईक विषयी... Droom च्या यादीतील बाईकची वैशिष्ट्ये Droom वेबसाइटवरील यादीत क्लासिक 350 बाईकचे 2015चे मॉडेल उपलब्ध आहे. या बाईकने केवळ 20805 किलोमीटर प्रवास केला आहे. किमतीचा विचार करायचा झाला तर ही बाईक खरेदी करण्यासाठी तुम्हाला केवळ 94,050 रुपये मोजावे लागतील. या बाईकच्या मालकाकडे बाईकची ओरिजनल आरसीही (RC) उपलब्ध आहे. रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 चे इंजिन आणि अन्य फिचर्स रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 ही बाईक नव्या फिचर्ससह मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आली होती. या बाईकमध्ये 346cc क्षमतेचे सिंगल सिलेंडर युक्त एअर कुल्ड USE इंजिन वापरण्यात आले आहे. हे इंजिन 19.3PS ची पॉवर आणि 28 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे. क्लासिक 350 बाईकमध्ये पारंपरिक गोलाकार हेडलाईट असून अॅनालॉग स्पीडोमीटर (Analog Speedometer) देण्यात आले आहे. ही बाईक मार्केटमध्ये दोन ट्रिममध्ये उपलब्ध आहे. यात एका ट्रिममध्ये सिंगल चॅनेल अॅण्टी लॉक ब्रेकींग सिस्टीम आणि दुसऱ्या ट्रिममध्ये ड्युअल चॅनेल उपलब्ध आहे. या बाईकमध्ये तुम्हाला ऑक्सिजन सेंसर, फ्लुएल इंजेक्शन आणि नवा एक्झॉस्ट (सायलेंन्सर) देण्यात आले आहेत. बाईक ट्युबलेस टायर आणि अलॉय व्हिलमध्येही उपलब्ध आहे. ही बाईक ब्लॅक, रेड, सिल्व्हर आणि गनमेटल ग्रे या रंगाच्या पर्यायात उपलब्ध आहे.
First published: