जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / 1.5 लाखांची सबसिडी, 8 वर्षांची वारंटी; शिक्षक आणि डॉक्टरांची आहे पहिली पसंद ही कार!

1.5 लाखांची सबसिडी, 8 वर्षांची वारंटी; शिक्षक आणि डॉक्टरांची आहे पहिली पसंद ही कार!

1.5 लाखांची सबसिडी, 8 वर्षांची वारंटी; शिक्षक आणि डॉक्टरांची आहे पहिली पसंद ही कार!

1.5 लाखांची रुपयांपर्यंतची सवलत या कार खरेदीला दिली जाते. शिक्षक आणि डॉक्टरांची पहिली पसंद ही कार आहे.

  • -MIN READ Local18 Chhattisgarh
  • Last Updated :

    सौरभ तिवारी, प्रतिनिधी बिलासपूर 30 मे : आजकाल अनेकजण सार्वजनिक वाहतुकीपेक्षा खासगी वाहनाने प्रवास करणे पसंत करतात. दुचाकी का असेना पण स्वतःची गाडी हवी, असे आता प्रत्येकालाच वाटते. खरंतर सध्या बोलबाला आहे तो इलेक्ट्रिक गाड्यांच्या. शहरांपासून गावा-गावांमध्ये रस्त्यांवरून इलेक्ट्रिक गाड्या धावताना दिसतात. छत्तीसगडच्या बिलासपूर भागाचा विचार करता तेथील नागरिकांची सर्वाधिक पसंती टाटाच्या Tiago EV या इलेक्ट्रिक गाडीला असल्याचे दिसून येते. मागील वर्षी जुलै महिन्यात लाँच झाल्यापासून शहरात 130 हून अधिक जणांनी ही गाडी विकत घेतली आहे. याचे कारण असे की, छत्तीसगडमध्ये या गाडीच्या खरेदीवर सरकारकडून 10% किंवा 1.5 लाख रुपयांपर्यंतची सवलत दिली जाते. या सुविधेचा लाभ नागरिक पुरेपूर घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    भारतीय बाजारपेठेत Tiago EV ची किंमत 8.69 लाख रुपयांपासून सुरू होते. या गाडीच्या बॅटरीवर 8 वर्षे आणि 1,60,000 किलोमीटरची वॉरंटी दिली जाते. तर, संपूर्ण गाडीसाठी 3 वर्षे आणि 1,25,000 किलोमीटरची वॉरंटी दिलेली असते. घरामध्ये 15A सॉकेट आणि 3.3 kW चा चार्जर वापरून Tiago EV चार्ज केल्यास चार्जिंगसाठी सुमारे 9 तासांचा कालावधी लागतो. तर, टाटाच्या चार्जिंग स्टेशनमध्ये वेगवान चार्जरने चार्ज करण्यास केवळ 55 मिनिटांत गाडी चार्ज होते.

    देशात कुठे तयार होते ट्रेन? एका बोगीवर किती होतो खर्च? पाहा फॅक्ट्रीमधील नजारा

    विशेष म्हणजे या गाडीत तुम्हाला हायपरस्टाईल चाके मिळतात. म्हणजेच स्टीलच्या चाकांवर टू-टोन व्हील कॅप्स उपलब्ध असतात. त्यासोबतच हरमनची टचस्क्रीन आणि साऊंड सिस्टीमसह 4 स्पीकर आणि 4 ट्वीटर्स उपलब्ध असतात. तसेच क्लायमेट कंट्रोल, फ्लॅट-बॉटम स्टिअरिंग, सीट्स, स्टोरेज स्पेस मिळते. त्याचबरोबर Tiago ev मध्ये 240 लीटर बूट स्पेसही दिलेली आहे. त्यामुळे सरकारची सवलत आणि गाडीतला आरामदायीपणा यामुळे लोकांची Tiago EVला प्रचंड पसंती आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात