मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Battlegrounds Mobile India ची धूम! 5 लाखाहून अधिक डाउनलोड, कंपनीकडून मिळतंय खास गिफ्ट

Battlegrounds Mobile India ची धूम! 5 लाखाहून अधिक डाउनलोड, कंपनीकडून मिळतंय खास गिफ्ट

दक्षिण कोरियन डेव्हलपर क्राफ्टनने या गेमच्या नोटिफिकेशनद्वारे इंडियन वापरकर्त्यांसाठी खास रिवॉर्ड डेव्हलपमेंट लिंक शेअर केली आहे.

दक्षिण कोरियन डेव्हलपर क्राफ्टनने या गेमच्या नोटिफिकेशनद्वारे इंडियन वापरकर्त्यांसाठी खास रिवॉर्ड डेव्हलपमेंट लिंक शेअर केली आहे.

दक्षिण कोरियन डेव्हलपर क्राफ्टनने या गेमच्या नोटिफिकेशनद्वारे इंडियन वापरकर्त्यांसाठी खास रिवॉर्ड डेव्हलपमेंट लिंक शेअर केली आहे.

नवी दिल्ली, 20 जून : 'बॅटलग्राउंड इंडिया' मोबाईल ॲपचे सुरुवातीच्या काही दिवसांमध्येच 50 लाखांहून अधिक डाउनलोड पूर्ण झाले आहेत. आता हे ॲप सर्वांसाठी प्ले स्टोअरवर उपलब्ध झाले आहे. दक्षिण कोरियन डेव्हलपर क्राफ्टनने या गेमच्या नोटिफिकेशनद्वारे इंडियन वापरकर्त्यांसाठी खास रिवॉर्ड डेव्हलपमेंट लिंक शेअर केली आहे. 17 जूनला काही टेस्टर्ससाठी ओपन बीटामध्ये गेम डाउनलोड करण्याचा ऑप्शन होता आणि 18 जूनला तो सर्वांसाठी ओपन करण्यात आला. आत्तापर्यंत डाऊनलोडची संख्या 50 लाखाहून अधिक झाली आहे. बॅटलग्राउंड इंडिया मोबाइल PUBG मोबाइलचा इंडियन व्हर्जन आहे. ज्याला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतात बंदी घालण्यात आली होती.

क्राफ्टनकडून प्रत्येक बॅटलग्राउंड मोबाइल इंडिया प्लेयर्ससाठी 50 लाख डाउनलोड पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद देण्या आला असून एक क्लासिक क्रेट कूपन दिलं आहे. या-गेम इवेंट स्क्रीनवर '5M डाउनलोड गिफ्ट' नोटिफिकेशन दिसत आहे, त्यावर लिहलं आहे ‘Thank you India! Celebrating 5M Downloads, we send our thanks with this extra gift! Please enjoy! नोटिफिकेशन गेम खेळणाऱ्यांना एक फ्री कूपन बहाल करत आहे. ज्याचा उपयोग गेम खेळणारे एक क्लासिक क्रेट उघडण्यासाठी आणि एक रँडम बक्षीस मिळवण्यासाठी त्याचा उपयोग करू शकतात.

क्राफ्टन या गेम विकसित करणार्‍या कंपनीने 17 जून रोजी सर्वप्रथम मर्यादित संख्येने बीटा चाचणीची सुरुवात केली. चाचणी स्लॉट जवळजवळ त्वरित भरले गेले, नंतर बीटा चाचणी प्रत्येकासाठी 18 जूनला उपलब्ध झाली.

या दरम्यान, कंपनीने सांगितले की आपण या गेमचे फर्स्ट इम्प्रेशन पाहू शकता, नंतर कंपनीने बीटा प्रोग्राममध्ये अधिक स्लॉट उपलब्ध केले. अर्ली एक्सेसच्या पहिल्या टप्प्यात सामील झालेल्या खेळाडूंना पुरवठा क्रेट कूपन, दोन EXP कार्ड आणि 2 x bp  कार्ड मिळते.

हे वाचा - PUBG गेम आता नव्या नावानं परतला; प्री-रजिस्ट्रेशन सुरू, कसं कराल?

आता जवळजवळ नऊ महिन्यांपासून प्रत्येकजण बॅटलग्राउंड मोबाईल इंडियाची आतुरतेने वाट पाहत असल्यामुळे बर्‍याच खेळाडूंनी हा गेम एकाच वेळी डाउनलोड केला यात विशेष आश्चर्य नाही. हा गेम PUBG मोबाइलची भारतीय आवृत्ती आहे, ज्यावर मागील वर्षी सप्टेंबरमध्ये देशात बंदी घालण्यात आली होती. मागील महिन्याच्या सुरुवातीस बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियाने गुगल प्ले स्टोअरवर पूर्व नोंदणीसाठी काम सुरू केलं होतं आणि या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 20 दशलक्ष गेम खेळणाऱ्यांची नोंदणी टप्पा पूर्ण केला आहे. पाच दशलक्ष डाउनलोड झालेला हा गेम अद्याप iOS डिव्हाइसवर आलेला नाही.

First published:

Tags: Pub-g, PUBG