सिद्दी जोहरच्या वेढ्यातून छत्रपती शिवराय सुखरूप विशालगडावर पोहोचावेत म्हणून बाजीप्रभूंसह ३०० मावळ्यांनी घोडखिंडीत हजारो गनिमांना रोखून धरलं. त्यांच्या बलिदानानं घोडखिंड पावनखिंड झाली.
“जोपर्यंत तोफेचा आवाज माझ्या कानाला ऐकू येत नाही, तोपर्यंत यमाला सांग मला मरायला वेळ नाही म्हणून”- वीर बाजीप्रभू देशपांडे
घोडखिंडीला आपल्या रक्ताचा अभिषेक घालून पावन करणाऱ्या वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन…