Home /News /technology /

आशा भोसलेंचं Insta account झालं हॅक; महाराष्ट्र पोलिसांनी सर्व यूजर्ससाठी जारी केला Alert

आशा भोसलेंचं Insta account झालं हॅक; महाराष्ट्र पोलिसांनी सर्व यूजर्ससाठी जारी केला Alert

आशा भोसले यांचं इन्स्टाग्राम हॅक (Asha Bhosle instagram hacked) झाल्यानंतर काही तासांतच रिस्टोअर झालं. पण त्यावरच्या सगळ्या पोस्ट डिलीट कराव्या लागल्या. Instagram वापरताना काय काळजी घ्यायची, कारण आता फक्त सेलेब्रिटी नव्हे तर सामान्यांच्याही अकाउंट्सना धोका निर्माण झाला आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 5 जानेवारी : महान गायिका आशा भोसले यांचं Instagram account सोमवारी हॅक झालं. अकाउंट हॅक झाल्याचं लक्षात येताच काही तासांतच ते रिकव्हर करण्यात यश आलं. पण त्यावरच्या सगळ्या पोस्ट डिलीट कराव्या लागल्या. या हॅकर्सच्या वाढलेल्या कारवायांमुळे सोशल मीडिया वापरतानाचा धोका वाढल्याची जाणीव झाली आहे. फक्त सेलेब्रिटींची अकाउंट्स नव्हे तर सामान्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सनासुद्धा हॅकर्सपासून धोका निर्माण झाला आहे. इन्स्टाग्राम (Instagram) हे सोशल नेटवर्किंगचं (social networking) एक लोकप्रिय माध्यम आहे. आता इन्स्टाग्रामबाबत महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलनं (Maharashtra Police cyber cell) एक अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलनं सांगितलंय तुमच्या इन्स्टा अकाउंटचं युजरनेम (username) आणि पासवर्ड (password) अजिबात कुणाशी शेअर करू नका. याबाबत तुम्हाला कथित कॉपीराईटचा (copyright) भंग होत असल्याचे एसएमएस किंवा ईमेल्स येतील. मात्र त्यांना बळी पडू नका. हॅक करणारे गुन्हेगार या माहितीचा उपयोग व्यक्तींना ब्लॅकमेल करण्यासाठी करत असल्याचे सायबर सेल पोलिसांनी सांगितलं. या फेक SMS मध्ये असा मजकूर असतो, 'तुमचं अकाउंट कॉपीराईटचा भंग केल्यामुळे येत्या 24 तासात बंद होईल.' ईमेल नोटिसमध्ये लिहिलेलं असतं, 'कॉपीराईटचा भंग केल्यामुळे तुमचं अकाउंट नेहमीसाठी डिलीट केलं जाईल.' या फेक नोटिसमध्ये इन्स्टाग्रामचा लोगो वापरलेला असल्याने ती एकदम खरी वाटते असंही पोलिसांनी सांगितलं. सायबर सेलनं ट्विट करत सांगितलं, की हे अटॅकर्स एका ओळीत इन्स्टाग्राम युजर्सना लक्ष्य करत आहेत. स्कॅमर्सकडे एकदा तुमची गुप्त माहिती पोचली, की ते लगोलग तुमच्या अकाउंट आणि प्रोफाईल फोटोसोबत छेडछाड करतात. आणि मग हे सगळं थांबवण्याच्या बदल्यात ते तुमच्याकडून पैशांची मागणी करतात. 'फिशिंग मेल किंवा एसएमएसमधून हे जाळं टाकलं जातं, ज्यात सांगितलेलं असतं, की इंस्टाग्रामच्या कॉपीराईटचा भंग केल्यानं २४ तासात तुमचं अकाउंट बंद होणार आहे. यातून इन्स्टा युजरला एक कॉपीराईट नोटीसही पाठवली जाते. हा दावा खोदून काढायचा असल्यास युजर्स तिथे दिलेल्या कॉपीराईट ऑब्जेक्शन फॉर्मवरही क्लिक करू शकतात. या खोट्या मेसेजमध्ये बऱ्याच व्याकरणाच्या आणि भाषेच्या चुका आढळतील. लिंकवर क्लिक केल्यास युजरला फेक इन्स्टा पेजवर रिडायरेक्ट केलं जातं. या पेजच्या युआरएलचा शेवट '.com' नं नाही तर '.cf' नं होतो. या पेजवर युजरला त्याचा ईमेल आयडी जन्मतारीख आणि इन्स्टाचा पासवर्ड मागितला जातो. सगळी खासगी माहिती जमवल्यावर हे फिशिंग पेज तुम्हाला तुमच्या खऱ्या अकाउंटवर रिडायरेक्ट करत. युजरकडून भरून घेतलेला कॉपीराइट ऑब्जेक्शन फॉर्म खरा असल्याचा भ्रम निर्माण करण्यासाठी हे केलं जातं.' पोलीस सहआयुक्त यशस्वी यादव यांनी सांगितलं. सायबर तज्ज्ञ रितेश भाटिया यांच्या मते या फिशिंग प्रकरणात युजरकडून मिळवलेला डाटा दहशतवाद्यांनाही विकला जाऊ शकतो. हॅकर्स केवळ सेलिब्रिटींच्या इन्स्टा अकाउंट्सना लक्ष्य करत नाहीत, तर एखाद्या जास्त फॉलोवर्स असलेल्या सामान्य व्यक्तीचं खातंही त्यांच्यासाठी या उपयोगात येऊ शकतं. ही हॅक अकाउंट्स मग डार्क वेबवर विकले जातात.'
    First published:

    Tags: Asha bhosle, Instagram

    पुढील बातम्या