मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

iPhone 13 वर आतापर्यंतचा सर्वांत मोठा Discount; अशी मिळवा 28 हजारांपर्यंतची बंपर सूट

iPhone 13 वर आतापर्यंतचा सर्वांत मोठा Discount; अशी मिळवा 28 हजारांपर्यंतची बंपर सूट

 iPhone 13 वर आतापर्यंतचा सर्वांत मोठा Discount; अशी मिळवा 28 हजारांपर्यंतची बंपर सूट

iPhone 13 वर आतापर्यंतचा सर्वांत मोठा Discount; अशी मिळवा 28 हजारांपर्यंतची बंपर सूट

नजीकच्या काळात मोबाइल घेण्याचं नियोजन असेल आणि त्यातही आयफोनचा विचार करत असाल तर iPhone 13 सध्याच्या घडीला तुमच्यासाठी सर्वांत स्वस्त डील होऊ शकतं. त्यासाठी पाहा ही भन्नाट ऑफर

मुंबई, 6 जून:  मोबाइल वापरणाऱ्या कित्येकांनी आपल्याकडे आयफोन (iPhone) असायला हवा, असं स्वप्न पाहिलेलं असतं. परंतु, मोबाइल गॅजेटच्या (Gadget) दुनियेतला सर्वांत विश्वासार्ह ब्रँड असलेल्या आयफोनची किंमत फार कमी जणांच्या आवाक्यात असते. त्यामुळे आयफोनचं वेड असणारे अनेक जण त्यांच्या बजेटमधल्या अँड्राइड मोबाइलवर हौस भागवतात. परंतु आता अशा आयफोन चाहत्यांचीही इच्छा पूर्ण होऊ शकते. कारण अ‍ॅपल (Apple) कंपनीने त्यांच्या आयफोन 13 (iPhone 13) मोबाइलवर तब्बल 28 हजार रुपयांची सवलत देऊ केली आहे. नजीकच्या काळात मोबाइल घेण्याचं नियोजन असेल आणि त्यातही आयफोनचा विचार करत असाल तर iPhone 13 सध्याच्या घडीला तुमच्यासाठी सर्वांत स्वस्त डील होऊ शकतं. ‘झी न्यूज हिंदी’ने आयफोनच्या आकर्षक सवलतीबाबत माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. अ‍ॅपल कंपनी प्रीमियम रिसेलरमार्फत (Premium Reseller) iPhone 13 ला केवळ 52,900 रुपयांमध्ये विकत आहे. हा फोन 79,900 रुपयांना गेल्या वर्षी लाँच करण्यात आला होता. आता त्यावर भरमसाठ सूट मिळत असल्याने आयफोन चाहत्यांनी याचा फायदा घ्यायला हवा. हे डील काही काळापुरतं मर्यादित आहे. iPhone 13 वर दिली जाणारी ही Instant Discount स्वरूपात नाही. त्यात 18 हजार रुपयांच्या एक्स्चेंज व्हॅल्treयूचा (Exchange Value) आणि कॅशबॅकचा (Cashback) समावेश आहे. अशी मिळणार iPhone 13 वर सूट प्रीमियम अ‍ॅपल स्टोअर असलेल्या iStore मध्ये iPhone 13 (128 GB) या मोबाइलची केवळ 52,900 रुपयांत विक्री केली जात आहे. यात 5 हजार रुपये इस्टंट डिस्काउंट आणि एचडीएफसी डेबिट आणि क्रेडिट (HDFC Debit and Credit) कार्डवरून व्यवहार केल्यास पाच हजार रुपयांची तत्काळ सवलत मिळणार आहे. तुमच्याकडे iPhone XR 64 GB सुस्थितीत असल्यास 18 हजार रुपयांचा एक्स्चेंज ऑफ मिळू शकतो. iPhone 13 च्या वेगवेगळ्या स्टोअरेज व्हॅरिएंटबरोबरच हिरव्या रंगाच्या व्हॅरिएंटसाठीही ही ऑफर लागू असणार आहे. हेही वाचा - मुलं YouTube, Netflix वर पाहतात? Adult कंटेन्ट अशा प्रकारे करा ब्लॉक, एक मिनिटाचं आहे काम iPhone 13 मोबाइलची वैशिष्ट्यं अ‍ॅपल कंपनीने iPhone 13 मध्ये 6.1 रेटिना XDR OLED डिस्प्ले दिला आहे. iOS 15 आणि अ‍ॅपलच्या A15 बायोनिक चिपसेटवर फोन चालतो. 4K व्हिडिओ आणि 12 MP सेल्फी कॅमेरा यात असून, उत्तम शूटसाठी तो सक्षम ठरतो. मोबाइलला 5 G कनेक्टिव्हिटी असून, मेगासेफ वायरलेस चार्जिंग आणि वाय-फाय 6 कनेक्टिव्हिटीला तो फोन सपोर्ट करतो. स्टोरेजची सुविधा आणि किमती iPhone 13 या मोबाइलच्या 256 GB स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 62,900 रुपये, 512 GB स्टोरेज फोनची किंमत 82,900 रुपये आहे. हिरव्या रंगाचा iPhone 13 (128 GB) फोनही 52,900 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय iPhone स्टोअरमध्ये आयफोन 13 प्रो, आयफोन 13 प्रो मॅक्स, आयफोन एसई 3 आणि आयफोन 13 मिनी या मोबाइल फोनवरही आकर्षक सवलत दिली जात आहे. आयफोन हे बजेटमध्ये बसणारं गॅजेट नसलं, तरी विश्वासार्हता आणि मोबाइलच्या दर्जासाठी वाट्टेल ती किंमत देऊन आयफोनच्या खरेदीकडे ग्राहकांचा ओढा असतो. iPhone 13 साठी आकर्षक सवलत दिल्यामुळे या मोबाइलची विक्री आणखी वाढू शकेल, असा अंदाज आहे.
First published:

Tags: Discount offer, Iphone, Technology

पुढील बातम्या