मुंबई, 28 एप्रिल : अँड्रॉईड फोन कितीही चांगले आले, तरी अॅपलच्या आयफोनची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. हे फोन पहिल्यापासूनच सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारे आहेत. त्यामुळे आयफोन घेणं हे जणू स्वप्न झालंय. मात्र आता तुम्हीही आयफोन विकत घेऊ शकता. त्यासाठी फ्लिपकार्टनं खास ऑफर आणली आहे. कंपनीनं आयफोन 11 हे मॉडेल आता बंद केलं आहे. त्याची विक्री अधिकृत अॅपल दुकानांमध्ये होत नाही. मात्र काही ई-कॉमर्स साइट्सवर हा फोन उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर या फोनसाठी खूप चांगली ऑफर देण्यात आलीय. यामुळे एखाद्या साध्या स्मार्टफोनच्या किंमतीत हा फोन ग्राहकांना मिळू शकतो. 1/5 : आयफोन 11 च्या बेस व्हेरियंटची किंमत फ्लिपकार्टवर 40,999 रुपये इतकी दाखवली जात आहे. फ्लिपकार्टच्या ऑफरमध्ये या फोनवर 2,901 रुपयांची थेट सवलत मिळणार आहे. अॅक्सिस बँकेच्या कार्डनं खरेदी केल्यास 5 टक्के कॅशबॅक मिळू शकेल. यामुळे फोनची किंमत 38,950 रुपये होईल. 2/5 : ग्राहकांना या फोनसाठी एक्स्चेंज ऑफरचाही लाभ घेता येईल. यामुळे फोनच्या किमतीत 26,250 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकेल. अशा पद्धतीनं सर्व ऑफर्स आणि सवलतींचा लाभ मिळाल्यास या फोनची किंमत 12,700 रुपये होईल.
3/5 : या सर्व ऑफर्समुळे ग्राहकांना या फोनच्या लिस्टेड किंमतीतून एकूण 31,200 रुपयांची सवलत मिळेल. अर्थात एक्स्चेंज ऑफरद्वारे चांगली किंमत मिळवायची असेल, तर ग्राहकांना चांगल्या अवस्थेतील फोन एक्स्चेंज करावा लागेल. नाहीतर एक्स्चेंज ऑफरद्वारे चांगले पैसे मिळणार नाहीत. 4/5 : अॅपलनं 2019मध्ये आयफोन 11 लाँच केला होता. हा सर्वांत जास्त विकला गेलेला फोन आहे. आता आयफोनची नवी मॉडेल्स आल्यामुळे कंपनीनं हा फोन गेल्या वर्षी बंद केला होता. या फोनमुळे आयफोन SE 3 5G च्या विक्रीवर परिणाम होत होता, हेही या फोनचं उत्पादन थांबवण्यामागचं एक कारण आहे. आयफोन 11 हे जुनं मॉडेल असलं, तरी खूप लोकप्रिय होतं. विशेष म्हणजे अजूनही या फोनला मागणी आहे. त्यामुळेच फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स साइट्सवर विशेष ऑफरसह हा फोन विक्रीसाठी उपलब्ध केलेला आहे.
5/5 : हा स्मार्टफोन 6.1 इंचाचा आहे. यात लिक्विड रेटिना एचडी डिस्प्ले आहे. A13 Bionic प्रोसेसर, ड्युएल 12 MP कॅमेरा आणि 12 MP सेल्फी कॅमेरा आहे.