मुंबई, 14 ऑक्टोबर: दसरा आणि दिवाळीसाठी शॉपिंग करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा कारण, अॅमेझॉन (Amazon) आपल्या ग्राहकांसाठी लवकरच 2 मोठे सेल सुरू करणार आहे. Amazon Great Indian Festival सेल 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. तर Amazon Prime ग्राहकांसाठी हाच सेल 16 ऑक्टोबरला सुरू होणार आहे. या सेलमध्ये अॅमेझॉनच्या उपकरणांवर मोठ्या प्रमाणात सवलत मिळणार आहे. अॅमेझॉन इको स्मार्ट स्पीकर्स, किंडल इ रिडर या सर्व उपकरणांवर जवळजवळ 50% सवलत ग्राहकांना मिळणार आहे.
अॅमेझॉन इको डॉट स्मार्ट स्पीकर (सेकंड जनरेशन)ची किंमत 4,299 रुपये इतकी आहे. या ऑफरमध्ये हे स्पीकर 2,299 रुपयांपर्यंत उपलब्ध होणार आहेत. 3,999 रुपयांची दी अॅमेझॉन फायर स्टीक 3 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध होणार आहे. तर अॅमेझॉन फायर स्टीक 4K ची मुळ किंमत 3,599 आहे. पण या सेलमध्ये 2,400 रुपयांना तुम्ही विकत घेऊ शकता. 'दी इको शो'वर जवळजवळ 3 हजार रुपयांचा डिस्काऊंट मिळणार आहे.
दी अॅमेझॉन इको प्लस (सेकंड जनरेशन)साठी या फेस्टिवलचा सर्वात मोठा डिस्काऊंट मिळणार आहे. या उपकरणाची खरी किंमत 14,999 रुपये आहे. इको प्लस ग्राहकांना फक्त 7,499 रुपयांना मिळेल. (अॅमेझॉन इको स्टुडिओ) Amazon Echo Studioची मुळ किंमत 18,999 रुपये आहे. ग्राहकांना यावर तब्बल 4,000 रुपयांचा डिस्काऊंट मिळणार आहे.
गेल्या महिन्यातच 'अॅमेझॉन ग्रेड इंडियन फेस्टिव्हल' (Amazon Great Indian Festival)ची जाहिरात करण्यात आली. ऑनलाईन खरेदीसाठी ग्राहक अॅमेझॉनला पसंती देत आहेत. सर्वात मोठा वार्षिक सेल म्हणून या सेलची ओळख आहे. अॅमेझॉनने सेलची घोषणा केल्यानंतर स्पर्धेत राहण्यासाठी फ्लिपकार्ट (Flipkart)ने सुद्धा Big Billion Days ची घोषणा केली आहे. त्यामुळे येणाऱ्या सणांच्या काळात ग्राहकांना ऑनलाईन सवलतींवर मोठा फायदा मिळणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे ग्राहक ऑनलाईन खरेदीलाच प्राधान्य देत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sale, Sale offers, Shopping