Home /News /technology /

एअरटेलचे ग्राहक नसाल तरी आता मिळणार 350 LIVE TV चॅनेल्सची Airtel Xstream सेवा

एअरटेलचे ग्राहक नसाल तरी आता मिळणार 350 LIVE TV चॅनेल्सची Airtel Xstream सेवा

यापूर्वी या अॅपचा वापर केवळ एअरटेल युझर्सलाच करता येत होता. मात्र, आता नॉन यूजर्सनासुद्धा Airtel Xstream चा वापरता येणार आहे. त्यासाठी काय करावं लागेल? वाचा सविस्तर...

  नवी दिल्ली, 23 डिसेंबर :  सध्या ग्राहकांना अनेक ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. त्यात एअरटेल एक्स्ट्रिम (Airtel Xstream) हा प्लॅटफॉर्म देखील विशेष लोकप्रिय आहे. परंतु यापूर्वी या अॅपचा वापर केवळ एअरटेल युझर्सलाच करता येत होता. मात्र, आता एअरटेलचे (Airtel) युझर्स नसलेल्यांना देखील एअरटेल एक्स्ट्रिमचा वापरता येणार आहे.
  नॅान एअरटेल सब्स्क्राईबर्स (Non-Airtel Suscribers) देखील आता एअरटेल एक्स्ट्रिमचा (Airtel Xstream) वापर करू शकतील, अशी घोषणा नुकतीच भारती एअरटेलने (Bharti Airtel) केली आहे. टेलीकॉम टॉकच्या वृत्तानुसार, आतापर्यंत एअरटेल एक्स्ट्रिम  (Airtel Xstream)  ही सेवा फक्त एअरटेल युझर्सलाच मिळत होती. कंपनी आता हे धोरण बदलण्याचा निर्णय घेत आहे. नॅान –एअरटेल युझर्सला एक्स्ट्रिम अपच्या सबस्क्रिब्शनचा फायदा घेण्यासाठी 499 रुपये खर्च करावा लागणार आहे. यात युझर्सला 350 पेक्षा अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल्स (Live Tv Channels) पाहण्याची संधी मिळणार आहे.
  आता नॅान-एअरटेल युझर्स मासिक किंवा वार्षिक एक्स्ट्रिम प्रीमियम प्लॅन खरेदी करुन एअरटेल एक्स्ट्रिमवरील कंटेट पाहू शकतात, शेअर करु शकतात तसेच तो डाऊनलोड देखील करु शकतात. एक्स्ट्रिम सेवेच्या माध्यमातून टिव्ही शोज तसेच इरोस नाऊ (Eros Now), हंगामा प्ले (Hungama Play) आणि झी5 (Zee5) यासह ओव्हर द टॉप (OTT) प्लॅटफार्म्सवर 10,000 हून अधिक फिल्मस सादर करण्यात येत असल्याचा दावा एअरटेलने केला आहे. यात ग्राहकांना 100 पेक्षा अधिक भाषांचा सपोर्ट मिळणार आहे.
  कंटेट पाहण्याव्यतरिक्त एअरटेल एक्स्ट्रिमवर ग्राहकांना फिल्मस आणि शोज डाऊनलोड करण्याची देखील सुविधा देण्यात आली आहे. यामुळे ग्राहक या डाऊनलोड केलेल्या फिल्मस किंवा शोज ऑफलाइन देखील बघू शकणार आहेत. तसेच ग्राहक आपला आवडता कंटेट थेट एअरटेल एक्स्ट्रिम अॅपवरुन शेअर करु शकणार आहेत.
  एअरटेल (Airtel) आपली एक्स्ट्रिम सेवा एअरटेल प्रीपेड, पोस्टपेड, ब्राॅडबॅण्ड आणि डीटीएच ग्राहकांना विनामूल्य देते. अर्थात ज्या प्लॅनमध्ये या सेवेचा समावेश आहे, असाच प्लॅन प्रीपेड ग्राहकांना रिचार्ज करावा लागतो. एअरटेल आपल्या प्रीपेड ग्राहकांकडून एअरटेल एक्स्ट्रिम सेवेसाठी मासिक 49 तर वार्षिक 499 रुपये शुल्क घेते. आता हेच शुल्क नॅान एअरटेल युझर्ससाठीही लागू करण्यात येणार आहे.
  काय करावं लागेल?
  एअरटेल एक्स्ट्रिमच्या सब्सक्रिप्शनसाठी ग्राहकांना प्ले स्टोअरवरून (Play Store) एक्स्ट्रिम अॅप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर अॅपमधील More  मध्ये जाऊन Plans & Offers वर टॅप करावे लागेल. त्यानंतर ग्राहक Recommended Packs मध्ये जाऊन सबस्क्रिप्शन घेऊ शकतात.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Airtel, OTT, Technology, Telecom, Telecom companies

  पुढील बातम्या