Home /News /technology /

अवघ्या काही रुपयांत महिनाभराची व्हॅलिडीटी; Airtel ने लाँच केले 4 स्वस्त रिचार्ज प्लॅन

अवघ्या काही रुपयांत महिनाभराची व्हॅलिडीटी; Airtel ने लाँच केले 4 स्वस्त रिचार्ज प्लॅन

एअरटेल (Airtel) या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या टेलिकॉम कंपनीनं प्रीपेड ग्राहकांसाठी 4 नवे प्लॅन्स (4 New Plans) लाँच केले आहेत.

मुंबई, 07 जुलै : कॉलिंग आणि पुरेसा डेटा ही मोबाईल ग्राहकांची सध्याची गरज आहे. कंपन्याही ग्राहकांची गरज ओळखून नवनवीन पॅक्स लाँच करत असतात. प्रीपेड ग्राहकांना (Prepaid Users) भरपूर व्हॅलिडिटी, कॉलिंग, डेटा असं सगळं एकत्र असणारा प्लॅन पसंत असतो. एअरटेल (Airtel) या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या टेलिकॉम कंपनीनं प्रीपेड ग्राहकांसाठी 4 नवे प्लॅन्स (4 New Plans) लाँच केले आहेत. या प्लॅन्सचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात इतर प्लॅन्सपेक्षा जास्त व्हॅलिडिटी (Extra Validity) मिळणार आहे. एअरटेल या टेलिकॉम कंपनीनं देशातील त्यांचं ग्राहकांचं जाळ विस्तारलं आहे. ग्राहकांना गरजेच्या सेवा माफक किमतीत देण्यासाठी सध्या एअरटेलनं त्यांच्या प्रीपेड ग्राहकांसाठी 4 नवीन प्लॅन्स आणले आहेत. आपला फोन ज्यांना संपूर्ण महिनाभर सुरु ठेवायचा आहे, त्यांना या प्लॅन्सचा विशेष फायदा होईल. सध्या एअरटेलकडून 99 रुपयांचा प्लॅन ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. मात्र यात केवळ 28 दिवसांचीच व्हॅलिडिटी मिळते. हे वाचा - UPI Payment Without Internet: टेन्शनच संपलं! इंटरनेटशिवायही करू शकता UPI पेमेंट; प्रोसेस आहे खूपच सोपी आता एअरटेलनं 109 आणि 111 तसंच 128 आणि 131 रुपयांचे प्लॅन्स आणले आहेत. नव्या 109 आणि 111 रुपयांच्या (Recharge Plans) दोन प्लॅन्समध्ये ग्राहकांना 200MB डेटा, 99 रुपयांचा टॉकटाइम मिळेल. लोकल SMS साठी 1 रुपयाचा दर तर STD SMS साठी दीड रुपये दर आकारला जाईल. यात ग्राहकांना 2.5 पैसे प्रतिसेकंद या दरानं कॉलिंगची सुविधा मिळेल. या दोन्ही प्लॅन्समध्ये ग्राहकांना जास्त व्हॅलिडिटी मिळणार आहे. 109 रुपयांच्या रिचार्जमध्ये 30 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल, तर 111 रुपयांच्या रिचार्जमध्ये एक महिन्याची व्हॅलिडिटी (One Month Validity) मिळेल. या दोन्ही प्लॅन्समध्ये 99 रुपयांच्या प्लॅनमधील इतर सर्व सुविधा मिळतील, मात्र व्हॅलिडिटी जास्त असेल. हे वाचा - PM Ujjwala Yojana: ‘या’ ग्राहकांना गॅस सिलिंडरवर पुन्हा मिळणार सबसिडी, फॉलो करा सोपी प्रोसेस 128 आणि 131 रुपयांचे आणखी दोन प्लॅन्स प्रीपेड ग्राहकांसाठी लाँच करण्यात आले आहेत. यातील 128 रुपयांच्या पॅकवर 30 दिवसांची व्हॅलिडिटी असेल, तर 131 दिवसांचा रिचार्ज प्लॅन एक महिन्यासाठी असेल. 2.5 पैसे प्रतिसेकंद या दरानं लोकल आणि STD कॉल करता येऊ शकेल. नॅशनल व्हिडिओ कॉलिंगसाठी 5 पैसे प्रतिसेकंद हा दर असेल. एक MB डेटासाठी युजर्सना 50 पैसे खर्च करावे लागतील. लोकल आणि STD SMS साठी अनुक्रमे एक व दीड रुपया लागेल. दोन्ही प्लॅन्समध्ये इतर सर्व सुविधा एकसारख्या आहेत. देशातील बहुतांश ग्राहक अजूनही प्रीपेड वापरतात. त्यामुळे प्रीप्रेड ग्राहकांसाठी टेलिकॉम कंपन्या सतत वेगवेगळे प्लॅन्स लाँच करतात. एअरटेलच्या या चार नव्या प्लॅन्समध्ये ग्राहकांना जास्तीची व्हॅलिडिटी मिळेल.
First published:

Tags: Recharge, Technology

पुढील बातम्या