मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Airtel आणि Jio 5G सेवा शहरांची यादी: आता या शहरांमध्येही मिळणार हायस्पीड इंटरनेट सेवा

Airtel आणि Jio 5G सेवा शहरांची यादी: आता या शहरांमध्येही मिळणार हायस्पीड इंटरनेट सेवा

या शहरांमध्येही मिळणार हायस्पीड इंटरनेट सेवा

या शहरांमध्येही मिळणार हायस्पीड इंटरनेट सेवा

Airtel and Jio 5G Service Cities List: Jio आणि Airtel सध्या भारतातील निवडक शहरांमध्ये 5G सेवा देत आहेत. आता दोन्ही कंपन्या लवकरच इतर शहरांमध्येही 5G सेवा सुरू करणार आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 19 ऑक्टोबर : अद्याप तुमच्यापर्यंत 5G सेवा पोहचली नसेल तर आता पोहचू शकते. कारण, मोबाईल नेटवर्क कंपन्या आता आपलं विश्व विस्तारत आहेत. जिओ आणि एअरटेल सध्या देशातील निवडक शहरांमध्ये 5G सेवा देत आहेत. जिओ 5G मुंबई, दिल्ली, वाराणसी आणि कोलकाता येथे उपलब्ध आहे, तर दुसरीकडे एअरटेल आठ शहरांमध्ये 5G सेवा देत आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, सिलीगुडी, नागपूर आणि वाराणसीचा समावेश आहे. दूरसंचार विभागाने पहिल्या टप्प्यात 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. अशा परिस्थितीत येत्या काही महिन्यांत एअरटेल आणि जिओ 5G सेवा इतर शहरांमध्येही सुरू होण्याची शक्यता आहे.

माहितीनुसार, जिओची 5G सेवा लवकरच अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगड, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, चेन्नई, लखनऊ आणि पुणे येथे उपलब्ध होऊ शकते. त्याच वेळी, एअरटेल आपली 5G सेवा अहमदाबाद, गांधीनगर, गुरुग्राम, कोलकाता, पुणे, जामनगर आणि चंदीगड येथे सुरू करणार आहे.

5G सिमची गरज नाही

5G नेटवर्क हायस्पीड इंटरनेट खात्री देते. 5G वर इंटरनेटचा टॉप स्पीड 4G 100 Mbps च्या टॉप स्पीडच्या तुलनेत 10 Gbps ला टच करू शकतो. म्हणजेच, 5G नेटवर्क वापरकर्त्यांना जलद डाउनलोड आणि अपलोड गती देईल. विशेष बाब म्हणजे कोणत्याही 5G सपोर्टेड स्मार्टफोनसाठी 5G सिम आवश्यक नाही. 5G सेवा वापरण्यासाठी, तुमच्याकडे फक्त 5G सपोर्टेड स्मार्टफोन असणे आवश्यक आहे.

वाचा - WhatsApp डेस्कटॉपवर आलं Voice Note फीचर, असं करेल काम

स्मार्टफोनला अपडेट्स मिळणे सुरू

बहुतेक Android स्मार्टफोन्सना 5G सपोर्टसाठी अपडेट मिळू लागले आहेत. सॅमसंगचे म्हणणे आहे की नोव्हेंबरच्या अखेरीस त्यांचे 5G डिव्हाइसेस 5G सेवेला सपोर्ट देतील. दुसरीकडे, Apple डिसेंबर 2022 पर्यंत 5G सॉफ्टवेअर अपडेटने आणण्याची योजना आखत आहे.

1 ऑक्टोबर सेवा लाँच

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 ऑक्टोबर रोजी इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) च्या सहाव्या आवृत्तीदरम्यान 5G सेवा सुरू केली. लाँचच्या वेळी, प्रमुख दूरसंचार ऑपरेटर रिलायन्स जिओने सांगितले होते की ते सुरुवातीला चार शहरांमध्ये 5G सेवा देतील, तर एअरटेलने आठ शहरांमध्ये सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. दोन्ही कंपन्या पुढील वर्षी या सेवेचा विस्तार करतील. दुसरीकडे, Vodafone Idea ने अद्याप त्यांच्या 5G सेवांच्या रोलआउटची तारीख जाहीर केलेली नाही. मात्र, अशी अपेक्षा आहे की ते येत्या काही महिन्यांत 5G सेवा आणतील.

First published:
top videos

    Tags: Airtel, High speed internet, Reliance Jio Internet