मुंबई, 1 फेब्रुवारी : इंटरनेट ही आजच्या काळाची गरज आहे. त्यात कोरोनामुळे 'वर्क फ्रॉम होम'ची मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाल्यामुळे तर इंटरनेट कायमच लागतं. मुलांचे ऑनलाइन क्लासेस, कुणाचे योगा क्लासेस, तर कुणाच्या ऑफिसच्या किंवा बिझनेस मीटिंग्ज यासाठी इंटरनेट अपरिहार्य आहे. त्यातच कोणी नेटफ्लिक्स पाहतं, आणि सोशल मीडिया तर घरातली जवळपास प्रत्येक व्यक्तीच वापरते. त्यामुळे इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. डेटा प्लॅन कमी कालावधीचा घेतला असेल, तर दर थोड्या दिवसांनी रिचार्ज करत राहावं लागतं. हा वारंवार रिचार्ज करण्याचा त्रास टाळायचा असेल, तर 84 दिवसांचं रिचार्ज करण्याचा पर्याय निवडू शकता. 2023 या वर्षात एअरटेलने 84 दिवस व्हॅलिडिटी असलेले चार प्रीपेड प्लॅन्स आणले आहेत. या चार प्लॅन्समध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सची माहिती घेऊ या.
एअरटेलचे हे चार अनलिमिटेड प्रीपेड प्लॅन्स 455, 719, 839 आणि 999 रुपये किमतीचे आहेत. एअरटेलचे ग्राहक त्यांच्या विद्यमान प्लॅन्सचा वापर करून Airtel 5G Plus Network चा आनंद घेऊ शकतात. त्यामुळे या नव्या चार प्रीपेड प्लॅन्सवरही ग्राहक ज्या शहरात 5G नेटवर्क उपलब्ध आहे तिथे त्या सेवेचा आनंद घेऊ शकतात. अलीकडेच आंध्र प्रदेश आणि तेलंगणमध्ये झालेल्या लाँचनंतर देशातल्या 67 शहरांत एअरटेलची 5 जी सेवा उपलब्ध आहे. आता या प्लॅन्सची माहिती घेऊ या.
999 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
84 दिवसांची व्हॅलिडिटी असलेला एअरटेलचा हा प्लॅन सर्वांत महागडा आहे. त्यामध्ये अनलिमिटेड कॉल्स, दर दिवशी 2.5 जीबी डेटा आणि दर दिवशी 100 एसएमएस अशी सुविधा मिळते. डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड 64 केबीपीएस होईल. या प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी डिस्ने+ हॉटस्टार मोबाइल, 84 दिवसांसाठी अॅमेझॉन प्राइम मेंबरशिप आणि 84 दिवसांसाठी एअरटेल एक्स्ट्रीम अॅपचा लाभ घेता येतो. हा प्लॅन रिवॉर्ड्समिनी सबस्क्रिप्शन, तीन महिन्यांसाठी अपोलो 24 बाय 7, फास्टॅगवर 100 रुपये कॅशबॅक आणि फ्री विंक म्युझिक आदी बेनिफिट्ससह येतो.
455 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
84 दिवसांची व्हॅलिडिटी देणारा एअरटेलचा हा सर्वांत स्वस्त प्लॅन आहे. यात अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल, 900 एसएमएस आणि 84 दिवसांसाठी 6 जीबी डेटा मिळतो. डेटा लिमिट संपल्यानंतर प्रति एमबी 50 पैसे दराने ग्राहक इंटरनेट वापरू शकतात. या प्लॅनमध्ये ग्राहकांना तीन महिन्यांसाठी अपोलो 24 बाय 7, फास्टॅगवर 100 रुपये कॅशबॅक आणि फ्री विंक म्युझिक हे बेनिफिट्सही मिळतात.
719 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
या 84 दिवसांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल, रोज 100 एसएमएस आणि 84 दिवस दररोज दीड जीबी डेटा मिळतो. डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64 केबीपीएस एवढाच मिळतो.
या प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी डिस्ने+ हॉटस्टार मोबाइल आणि 84 दिवसांसाठी एअरटेल एक्स्ट्रीम अॅपचा लाभ घेता येतो. हा प्लॅन रिवॉर्ड्समिनी सबस्क्रिप्शन, तीन महिन्यांसाठी अपोलो 24 बाय 7, फास्टॅगवर 100 रुपये कॅशबॅक आणि फ्री विंक म्युझिक आदी बेनिफिट्ससह येतो. एअरटेल थँक्स अॅपच्या माध्यमातून रिचार्ज केल्यास ग्राहक अॅप एक्सक्लुझिव्ह 2 जीबी डेटा कुपनचाही लाभ घेऊ शकतात. या प्लॅनच्या किमतीचा विचार करता 28 दिवसांसाठी 240 रुपये, तर प्रति दिन 8.55 रुपये खर्च येईल.
839 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
या प्लॅनमध्ये 719 रुपयांच्या प्लॅनचे सर्व लाभ मिळतात. त्याव्यतिरिक्त डेली 2 जीबी डेटा मिळतो. डेटा लिमिट संपल्यावर इंटरनेट स्पीड 64 केबीपीएस मिळतो. एअरटेल थँक्स अॅपच्या माध्यमातून रिचार्ज केल्यास ग्राहक अॅप एक्सक्लुझिव्ह 2 जीबी डेटा कुपनचाही लाभ घेऊ शकतात. या प्लॅनसोबतच्या एअरटेल एक्स्ट्रीम अॅप बेनिफिट्ससह शार्क टँक 2 पाहता येईल. या प्लॅनचा रोजचा खर्च 9.98 रुपये असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Airtel