Home /News /technology /

5G services in India: 15 ऑगस्टला नव्हे, ‘या’ दिवशी देशात सुरु होईल 5G सेवा; किंमतही असेल स्वस्त

5G services in India: 15 ऑगस्टला नव्हे, ‘या’ दिवशी देशात सुरु होईल 5G सेवा; किंमतही असेल स्वस्त

5G services in India: 15 ऑगस्टला नव्हे, ‘या’ दिवशी देशात सुरु होईल 5G सेवा; किंमतही असेल स्वस्त

5G services in India: 15 ऑगस्टला नव्हे, ‘या’ दिवशी देशात सुरु होईल 5G सेवा; किंमतही असेल स्वस्त

India 5G services launch: एका अहवालानुसार, 29 सप्टेंबर रोजी इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) 2022 च्या उद्घाटनावेळी 5G सेवा भारतात अधिकृतपणे सुरू होण्याची शक्यता आहे.

    मुंबई, 06 ऑगस्ट: देशात 5G सेवेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रत्येकजण 5G सेवा सुरू होण्याची आतुरतेनं वाट पाहत आहे. काही रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं जात होतं की 5G सेवा भारतात 15 ऑगस्ट रोजी लॉन्च केली जाईल, परंतु अलीकडील अहवालानुसार, 29 सप्टेंबर रोजी इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) 2022 उद्घाटनावेळी भारतात 5G सेवा अधिकृतपणे सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर द हिंदू बिझनेसलाइन या इंग्रजी दैनिकाशी बोलताना ही माहिती दिली असल्याचं MySmartPrice ने आपल्या अहवालात म्हटलं आहे. तत्पूर्वी, भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या लाल किल्ल्यावरून होणाऱ्या भाषणाद्वारे, भारतात 5G सेवांचा औपचारिक शुभारंभ होणार होता. लिलावात दीड लाख कोटींहून अधिक कमाई- 5G साठी भारताच्या स्पेक्ट्रम लिलावात विक्रमी उलाढाल झाली, ज्याचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की भारत सरकारने 5G स्पेक्ट्रमच्या (5G Spectrum) लिलावातून एकूण 1.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया यांसह, आता अदानी डेटा नेटवर्क देखील (Adani Data Network) खाजगी दूरसंचार उद्योगात सामील झाली आहे. लिलावाच्या शेवटच्या दिवसापूर्वी 30 जुलै रोजी मुंबईत 5G तंत्रज्ञानामधील भारतातील संधीं या विषयावरील परिषदेत बोलताना केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं की, “देशातील 5G ​​सेवा एक किंवा दोन वर्षात देशभरात व्यापक स्वरुपात उपलब्ध होईल. यावर्षी ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण भारतभरात पहिला टप्पा पूर्ण झाल्याचं दिसू शकेल.” या महिन्यात भारतात 5G सेवा तैनात करणार - Airtel या आठवड्याच्या सुरुवातीला, भारती एअरटेलच्या एका प्रेस स्टेटमेंटने सॅमसंगसोबत नवीन कराराची घोषणा केली आणि देशातील 5G ​​रेडिओ ऍक्सेस नेटवर्कसाठी Nokia आणि Ericsson सोबत आधीच अस्तित्वात असलेल्या करारांचा विस्तार केला. घोषणेदरम्यान, एअरटेलच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, टेल्को या महिन्यात भारतात 5G सेवा तैनात करण्यास सुरुवात करेल. हेही वाचागुटखा शौकीन चोरांचा कारनामा! चोरला 10.50 लाख रुपयांचा विमल गुटखा 5G प्लॅनची ​​किंमत किती असेल? 5G सेवांच्या किंमतींच्या बाबतीत बोलताना केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी सूचित केलं आहे की 5G डेटा प्लॅनची ​​किंमत भारतामध्ये 4G सेवेप्रमाणे परवडणारी असेल. आपल्या भाषणादरम्यान, वैष्णव यांनी निदर्शनास आणलं की जागतिक स्तरावर 4G सेवांची किंमत दरमहा 2,000 रुपयांपेक्षा जास्त आहे, तर भारतात दूरसंचार सेवांची किंमत 200 रुपयांपेक्षा कमी आहे. 5G च्या रोलआउटसह, कोणीही समान किंमतीची अपेक्षा करू शकतो. या शहरांमध्ये सेवा होईल सुरू - एअरटेल आणि जिओ हे सरकारच्या 5G लिलावात सर्वात मोठे स्पेक्ट्रम अधिग्रहित करणारे आणि खर्च करणारे ठरले. याशिवाय इतर दूरसंचार कंपन्यांसह ऑक्टोबरपर्यंत 5G सेवा सुरु होण्याची अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैदराबाद आणि इतर सारख्या मोठ्या शहरांसह 13 शहरांचा समावेश असेल.
    Published by:Suraj Sakunde
    First published:

    Tags: High speed internet, Technology

    पुढील बातम्या