मुंबई, ८ जानेवारी: क्रिकेट जगतात आपली वेगळी ओळख निर्माण करू पाहणाऱ्या झिम्बाब्वे क्रिकेट संघाला एक मोठा धक्का बसला आहे. झिम्बाब्वेच्या महिला क्रिकेट संघाची ३७ वर्षीय सहाय्यक प्रशिक्षिका सिनिकिवे एमपोफू हिचा अचानक मृत्यू झाला आहे. एमपोफूच्या मृत्यू पूर्वी १५ डिसेंबरला तिचे पती शेफर्ड माकुनुरा यांचे निधन झाले होते. शेफर्ड माकुनुरा हे देखील झिम्बाब्वेच्या वरिष्ठ पुरूष संघाचे फिल्डिंग प्रशिक्षक होते. या दोघांच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर झिम्बाब्वे क्रिकेट हादरले आहे. झिम्बाब्वे क्रिकेट असोसिएशनने प्रशिक्षिका सिनिकिवे एमपोफू हिच्या मृत्यूनंतर सोशल मीडिया पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये झिम्बाब्वे क्रिकेट असोसिएशनने या घटनेबाबत माहिती दिली. एमपोफू या झिम्बाब्वेच्या माजी महिला क्रिकेटपटू देखील आहे. त्या आपल्या घरात शनिवारी सकाळी अचानक कोसळल्या होत्या. त्यानंतर त्यांना रूग्णालयात नेण्यात आले त्यावेळी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्रशिक्षिका सिनिकिवे एमपोफू यांचा मृत्यू कशामुळे झाला याचा शोध घेण्यासाठी त्यांचे पोस्टमार्टम करण्यात येणार आहे.
Mpofu has been part of the technical teams that have seen Zimbabwe Women dominating Africa, earning one-day international status and recently finishing just one win away from qualifying for the ICC Women’s T20 World Cup. #RIPSneeze pic.twitter.com/8hX8qRd5sI
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) January 7, 2023
एमपोफूच्या मृत्यू पूर्वी १५ डिसेंबरला तिचे पती शेफर्ड माकुनुरा यांचा मृत्यू झाला होता. एमपोफू या आपले पती माकुनूरा यांच्या निधनाच्या धक्क्यातून अजून सावरल्याही नव्हत्या तोपर्यंत त्यांचाही अचानक मृत्यू झाला. या प्रशिक्षक पती पत्नी जोडीला दोन मुले देखील आहेत. हे ही वाचा : IND VS SL : सूर्यकुमारने राजकोटच्या मैदानावर तोडला रोहित शर्माचा रेकॉर्ड एमपोफू यांचा जन्म बुलावेयो येथे 21 फेब्रुवारी 1985 मध्ये झाला होता. त्या एक गुणवान अष्टपैलू खेळाडू होत्या. झिम्बाब्वेच्या महिला संघाने 2006 मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता आणि एमपोफू या त्या ऐतिहासिक संघाच्या सदस्य होत्या. त्यांनी शाळेपासूनच क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर उत्तम खेळीमुळे त्यांना झिम्बाब्वे संघात खेळण्याची संधी मिळाली.