Home /News /sport /

इंग्लंडनंतर आणखी एका टीम कोरोनामुळे अडचणीत, मॅचच्या एक दिवस आधी 2 खेळाडू बाहेर

इंग्लंडनंतर आणखी एका टीम कोरोनामुळे अडचणीत, मॅचच्या एक दिवस आधी 2 खेळाडू बाहेर

इंग्लंड क्रिकेट टीममधल्या (England Cricket) 7 जणांना कोरोनाची लागण झाली, यात 3 खेळाडू आणि 4 सपोर्ट स्टाफचा समावेश आहे. टीममध्ये कोरोनाचा (Corona Virus) शिरकाव झाल्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या वनडे सीरिजआधी इंग्लंडला (England vs Pakistan) त्यांच्या टीममध्ये तडकाफडकी बदल करावे लागले.

पुढे वाचा ...
    हरारे, 6 जुलै : इंग्लंड क्रिकेट टीममधल्या (England Cricket) 7 जणांना कोरोनाची लागण झाली, यात 3 खेळाडू आणि 4 सपोर्ट स्टाफचा समावेश आहे. टीममध्ये कोरोनाचा (Corona Virus) शिरकाव झाल्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या वनडे सीरिजआधी इंग्लंडला (England vs Pakistan) त्यांच्या टीममध्ये तडकाफडकी बदल करावे लागले. एकीकडे इंग्लंडच्या टीमला कोरोनाने ग्रासलं असतानाच झिम्बाब्वेच्या (Zimbabwe) टीममधल्या खेळाडूंनाही कोरोनाची लागण झाली आहे. सीन विलियम्स (Sean Williams) आणि क्रेग इर्विन (Craig Ervine) यांना बांगलादेशविरुद्धच्या एकमेव टेस्टमधून बाहेर करण्यात आलं आहे. बुधवारपासून झिम्बाब्वे आणि बांगलादेश (Zim vs Ban) यांच्यातल्या सीरिजला सुरुवात होणार आहे. यानंतर वनडे आणि टी-20 सीरिजही खेळवली जाणार आहे. क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार झिम्बाब्वे क्रिकेटचे मीडिया प्रबंधक डार्लिंगटन माजोंगा म्हणाले, 'सीन विलियम्स आणि क्रेग इर्विन मागच्या आठवड्यात घोषित करण्यात आलेल्या 20 सदस्यीय टीमचा भाग होते, पण आता ते टीमसोबत येऊ शकत नाहीत. कुटुंबातल्या कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे ते क्वारंटाईन झाले आहेत.' या दोघांच्या अनुपस्थितीमध्ये नव्या खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळेल, असा विश्वास झिम्बाब्वे टीमचा कर्णधार ब्रेंडन टेलर याने व्यक्त केला आहे. 'आम्हाला काही अनुभवी खेळाडूंची कमी जाणवत आहे. पण टीममध्ये काही युवा आणि चांगले खेळाडू आहेत. त्यांच्यासाठी स्वत:ला सिद्ध करण्याची चांगली संधी उपलब्ध आहे,' असं टेलर म्हणाला. झिम्बाब्वे आणि बांगलादेश यांच्यातली एकमेव टेस्ट 7-11 जुलैपर्यंत खेळवली जाईल. यानंतर दोन्ही देशांमध्ये तीन वनडे आणि तीन टी-20 मॅचची सीरिज होईल. वनडे सीरिजचे सामने 16 जुलै, 18 आणि 20 जुलैला होतील. तर टी-20 सीरिज 23 जुलै, 25 जुलै आणि 27 जुलैला खेळवली जाईल.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Bangladesh cricket team, Coronavirus, Cricket, Zimbabwe

    पुढील बातम्या