Home /News /sport /

IPL 2021 : आयपीएल स्थगित झाली नसती तरी सोडून गेलो असतो, चहलने सांगितलं कारण

IPL 2021 : आयपीएल स्थगित झाली नसती तरी सोडून गेलो असतो, चहलने सांगितलं कारण

आयपीएल (IPL 2021) स्थगित झाली नसती, तरी आपण स्पर्धा अर्ध्यातूनच सोडून निघून जाणार होतो, असा खुलासा आरसीबीचा (RCB) लेग स्पिनर युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) केला आहे.

    मुंबई, 22 मे : आयपीएल (IPL 2021) स्थगित झाली नसती, तरी आपण स्पर्धा अर्ध्यातूनच सोडून निघून जाणार होतो, असा खुलासा आरसीबीचा (RCB) लेग स्पिनर युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) केला आहे. चहलच्या आई-वडिलांना कोरोनाची (Corona Virus) लागण झाली होती, यानंतर त्याने आयपीएल सोडण्याचा निर्णय जवळपास निश्चित केला होता. स्पोर्ट्स तकशी बोलताना चहलने त्याच्या घरातली परिस्थिती सांगितली. 3 मे रोजी चहलचे आई-वडील कोरोना पॉझिटिव्ह झाले, पण चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Varma) बायो-बबलमध्ये होती. चहलच्या वडिलांची तब्येत जास्त खराब झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर त्याच्या आईवर घरातच उपचार करण्यात आले. आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. खेळाडूंसह सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाली, त्यामुळे स्पर्धा 29 सामन्यांनंतर स्थगित करण्यात आली. आरसीबीला मोक्याच्या क्षणी विकेट घेऊन देणारा चहल आयपीएलच्या यंदाच्या मोसमात अपयशी ठरला. 7 मॅचमध्ये त्याला 4 विकेट मिळाल्या. युझवेंद्र चहल आता श्रीलंका दौऱ्यावर (India vs Sri Lanka) भारतीय टीमसोबत जाईल. भारत आणि श्रीलंका यांच्यात वनडे आणि टी-20 सीरिज होणार आहे. चहलसाठी ही सीरिज महत्त्वाची आहे, कारण खराब फॉर्ममुळे तो बहुतेकवेळा टीमच्या बाहेर असतो. तसंच टी-20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) निवड व्हायची असेल, तर त्याला श्रीलंकेत चांगली कामगिरी करावी लागणार आहे. युझवेंद्र चहलला श्रीलंका दौऱ्यात राहुल चहरकडून (Rahul Chahar) आव्हान मिळू शकतं. आयपीएल 2021 मध्ये राहुल चहरने मुंबईकडून खेळताना 7 सामन्यांमध्ये 11 विकेट घेतल्या, त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपसाठी या दोन लेग स्पिनर्समध्ये स्पर्धा रंगेल.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Coronavirus, Cricket, IPL 2021, RCB, Yuzvendra Chahal

    पुढील बातम्या