मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Yuzvendra Chahal-Dhanashree Verma: युजवेंद्र चहल-धनश्री वर्माच्या नात्यात दुरावा? क्रिकेटरच्या पत्नीने इन्स्टावरुन हटवलं आडनाव

Yuzvendra Chahal-Dhanashree Verma: युजवेंद्र चहल-धनश्री वर्माच्या नात्यात दुरावा? क्रिकेटरच्या पत्नीने इन्स्टावरुन हटवलं आडनाव

भारतीय क्रिकेट संघाचा लोकप्रिय स्पिनर युजवेंद्र चहल आपल्या खेळासोबतच आपल्या खाजगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो.

भारतीय क्रिकेट संघाचा लोकप्रिय स्पिनर युजवेंद्र चहल आपल्या खेळासोबतच आपल्या खाजगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो.

भारतीय क्रिकेट संघाचा लोकप्रिय स्पिनर युजवेंद्र चहल आपल्या खेळासोबतच आपल्या खाजगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 18 ऑगस्ट-   भारतीय क्रिकेट संघाचा लोकप्रिय स्पिनर युजवेंद्र चहल आपल्या खेळासोबतच आपल्या खाजगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. चहल आणि त्याची पत्नी धनश्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात.हे दोघे लोकप्रिय सेलिब्रेटी कपल्सपैकी एक आहेत. या दोघांची जोडी प्रचंड पसंत केली जाते. सतत दोघेही सोशल मीडियावरुन आपलं प्रेम व्यक्त करत असतात. परंतु त्यांच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी आहे. चहल आणि धनश्रीच्या नात्यात काहीतरी बिनसल्याचं म्हटलं जात आहे. नेहमीच आपल्या डान्स आणि ग्लॅमरस फोटोंमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेणारी धनश्री आज एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. धनश्रीच्या एका गोष्टीने सर्वांनाच धक्का बसला आहे. नुकतंच धनश्रीने आपल्या इन्स्टाग्रामवरुन चहल हे आडनाव काढून टाकलं आहे. याआधी धनश्री आपल्या इन्स्टाग्रामवर धनश्री वर्मा-चहल असं नाव लावत होती. मात्र अचानक तिने चहल हे आडनाव हटवलं आहे. त्यांनतर सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यांनतर युजवेंद्र चहलने आपल्या इन्स्टाग्रामवर एक क्रिप्टीक पोस्ट शेअर करत सर्वांनाच चकित केलं आहे. यामध्ये चहलने लिहलंय, 'नव्या आयुष्याची सुरुवात होत आहे'. क्रिकेटरच्या या पोस्टने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या सर्व प्रकारानंतर हे जोडपं आता एकत्र राहणार नसल्याचा अंदाज बांधला जात आहे. या दोघांच्या नात्यात अडचणी सुरु असल्याचं यावरुन स्पष्ट होत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.मात्र युजवेंद्र चहल-धनश्री वर्माने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीय. (हे वाचा:Koffee With Karan 7: अखेर सिद्धार्थने दिली कियारासोबतच्या नात्याची कबुली;सांगितला वेडिंग प्लॅन ) युजवेंद्र आणि धनश्रीची लव्हस्टोरी फारच रंजक आहे. या दोघांची पहिली भेट एका ऑनलाईन क्लासदरम्यान झाली होती. यांनतर त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. त्यांनतर त्यांनी लग्नगाठ बांधली होती. धनश्री सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. तिचे जवळजवळ 26 लाख फॉलोअर्स आहेत. ती बॉलिवूडच्या विविध गाण्यांवर डान्सचे रील्स बनवत असते.
First published:

Tags: Cricket, Entertainment, Yuzvendra Chahal

पुढील बातम्या