मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /WTC Final : सलग दुसऱ्यांदा भारत पोहोचला WTC फायनलमध्ये! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये कसा आहे भारताचा इतिहास?

WTC Final : सलग दुसऱ्यांदा भारत पोहोचला WTC फायनलमध्ये! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये कसा आहे भारताचा इतिहास?

सलग दुसऱ्यांदा भारत पोहोचला WTC फायनलमध्ये!

सलग दुसऱ्यांदा भारत पोहोचला WTC फायनलमध्ये!

भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान मिळवलं आहे. यासह भारताने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याचा मान मिळवला असून लंडन येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनलचा सामान खेळवला जाईल.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 13 मार्च : न्यूझीलंडने श्रीलंके विरुद्धच्या कसोटी सामन्यात श्रीलंकेला 2 विकेट्सने पराभूत करून विजय मिळवला. न्यूझीलंडच्या या विजयामुळे भारताचा संघ थेट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. यासह भारताने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याचा मान मिळवला आहे. भारताचा सामना आता फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाशी होणार असून हा सामना जून महिन्यात लंडनमध्ये होईल.

7 जून ते 11 जून या दरम्यान लंडन येथे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा फायनल सामना पारपडले. यापूर्वी 2021 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचला होता. त्यावेळी भारताचा सामना हा न्यूझीलंड सोबत झाला होता. परंतु या सामन्यात न्यूझीलंडकडून भारताला पराभव पत्करावा लागला आणि 2021 चा  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा किताब न्यूझीलंडने जिंकला.

आयसीसी टेस्ट चॅम्पिअनशिपच्या इतिहासात भारताने आतापर्यंत 10 वेळा फायनल सामन्यात विजय मिळवला असून 5 वेळा भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर 2 वेळा भारताचे सामने ड्रॉ झाले आहेत. 2010 रोजी भारताने एम एस धोनीच्या नेतृत्वात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल जिंकली. तर त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी भारताने 2017 रोजी पुन्हा एकदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनची ट्रॉफी जिंकली.

First published:
top videos

    Tags: Cricket, Cricket news, MS Dhoni, Test cricket, Virat kohli, WTC ranking