लंडन, 9 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया आणखी मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 123/4 एवढा झाला आहे. मार्नस लाबुशेन 41 रनवर तर कॅमरून ग्रीन 7 रनवर खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाची आघाडी आता 296 रनवर पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियाचे पहिल्या इनिंगचे शतकवीर स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेव्हिस हेड यांना रवींद्र जडेजाने माघारी पाठवलं. तर उस्मान ख्वाजाला उमेश यादवने आणि डेव्हिड वॉर्नरला मोहम्मद सिराजने आऊट केलं. त्याआधी मॅचच्या तिसऱ्या दिवशी भारताचा 296 रनवर ऑल आऊट झाला. अजिंक्य रहाणेने 89 रनची शार्दुल ठाकूरने 51 रनची खेळी केली. अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर यांच्यात सातव्या विकेटसाठी 109 रनची पार्टनरशीप झाली. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सला सर्वाधिक 3 विकेट मिळाल्या. तर स्टार्क, बोलण्ड आणि ग्रीन यांना 2-2 विकेट घेण्यात यश आलं. ऑफ स्पिनर नॅथन लायनलाही एक विकेट मिळाली. तिसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाची आघाडी 300 रनच्या जवळ पोहोचल्यामुळे तसंच मॅचचे अजून दोन दिवस शिल्लक असल्यामुळे आता ऑस्ट्रेलियाचा पराभव कठीण वाटत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये आता ड्रॉ किंवा ऑस्ट्रेलियाचा विजय या दोनच शक्यता सर्वाधिक आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.