दिल्ली, 05 जून : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी आंदोलन पुकारले आहे. या कुस्तीपटूंनी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत काय घडले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. बृजभूषण सिंह यांच्यावर ५ दिवसात कारवाई करावी असा इशारा कुस्तीपटूंनी दिला होता. अमित शहा आणि कुस्तीपट्टूंची शनिवारी रात्री दोन तासांहून अधिक काळ चर्चा झाली. यात बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि काही प्रशिक्षकसुद्धा होते. बजरंग पुनियाने सांगितलं की,“गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. यावर मी जास्त बोलू शकत नाही.” बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट हे बृजभूषण यांच्याविरोधात आंदोलनात सर्वात पुढे आहेत. अल्पवयीन मुलीसह सात महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दिल्ली पोलिसांनी २८ एप्रिल रोजी बृजभूषण सिंह यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली होती. Train Accident : रेल्वे पुन्हा ट्रॅकवर, तरी जबाबदारी संपलेली नाही; केंद्रीय मंत्र्यांना अश्रू अनावर एफआयआरमध्ये १५ लैंगिंक शोषणाच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. यात १० प्रकरणात मर्जीविरुद्ध चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप आहे. यात पाठलाग करणं आणि धमकी दिल्याच्या तक्रारीचाही समावेश आहे. चार राज्यातील १२५ संभाव्य साक्षीदारांचे जबाब दिल्ली पोलिसांनी नोंदवल्याचंही म्हटलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.