मुंबई, 24 मार्च : भारतात प्रथमच आयोजित करण्यात आलेली महिला प्रीमियर लीग ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. 26 फेब्रुवारी रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना पारपडणार असून याच सोबत एक संघ महिला आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरणार आहे. ट्रॉफी आणि पहिल्या महिला आयपीएलच्या विजेतेपदाचा मान मिळण्यासोबतच विजेत्या संघावर कोट्यवधींचा पाऊस देखील पडणार आहे.
4 मार्च पासून सुरु झालेल्या महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सिझनमध्ये 5 संघांचा सहभाग होता. यंदा या स्पर्धेत एकूण 20 सामने खेळवले गेले असून यापैकी मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल आणि यूपी वॉरियर्स या 3 संघानी प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवले आहे. तर यातून +1.856 या नेट रन रेटने पॉईंट टेबलवर प्रथम स्थानी असलेला दिल्ली कॅपिटलचा संघ थेट अंतिम सामन्यात पोहोचला आहे. तर 24 मार्च रोजी मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यासंघांमध्ये सेमी फायनलचा सामना पारपडणार आहे.
महिला प्रीमियर लीगच्या विजेत्या संघाला 6 कोटी रुपयांची प्राईज मनी देण्यात येणार आहे. यासोबतच उपविजेता संघ आणि प्ले ऑफमध्ये पोहोचलेला रनर अप संघ देखील मालामाल होणार आहे. महिला आयपीएलच्या उपविजेत्या संघाला 3 कोटी तर रनर अप संघाला १ कोटींची प्राईज मनी देण्यात येणार आहे. महिला आयपीएलचा अंतिम सामना ब्रेबॉन स्टेडियमवर खेळवला जाणार असून यंदा कोणता संघ विजेतेपदाचा मान मिळवणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi capitals, Mumbai Indians, RCB, WPL 2023