मुंबई, 26 मार्च : भारतात आयोजित करण्यात आलेल्या महिला प्रीमियर लीगचा अंतिम सामना आज पारपडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 7 विकेट्सने पराभव केला असून पहिल्या महिला आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. महिला आयपीएलमधील अंतिम सामना जिंकून हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने विजेत्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. महिला आयपीएलचा अंतिम सामना मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियमवर खेळवण्यात आला असून या सामन्यात सुरुवातीला दिल्ली संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी फलंदाजीसाठी उतरलेल्या दिल्ली संघाचा मुंबईच्या घातक गोलंदाजांसमोर टिकाव लागू शकला नाही. 20 षटकात दिल्ली संघाने 9 विकेट्स गमावून 131 धावा केल्या. दिल्लीने मुंबईला विजयासाठी 132 धावांचे आव्हान दिले. दिल्ली संघाकडून केवळ मेग लॅनिंग, शफाली वर्मा, शिखा पांडे, मारिझान कॅप यांनाच धावांचा दुहेरी आकडा गाठता आला. यातही दिल्लीकडून मेग लॅनिंगने 35 धावा अशी सर्वोच्च धाव संख्या केली. विजयासाठी 132 धावांच आव्हान मिळालं असताना फलंदाजीसाठी आलेल्या मुंबई संघाची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या षटकात यस्तिका भाटियाची विकेट पडली, त्यानंतर लगेचच हेली मॅथ्यूज केवळ 13 धावा करून चौथ्या षटकात बाद झाली. त्यानंतर हरमनप्रीत आणि नॅट सायव्हर-ब्रंट मुंबईच डाव सावरला. परंतु 39 चेंडूवर 37 धावा करून बाद झाली. परंतु नॅट सायव्हर-ब्रंटने 60 धावांची नाबाद खेळी केली अमेलिया केरच्या साथीने तिने मुंबईचे विजयाच आव्हान पूर्ण केलं. अंतिम सामना जिंकून मुंबई इंडियन्सने महिला आयपीएलच्या पहिल्या ट्रॉफीवर नाव कोरून इतिहास रचला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







