जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / झारखंडच्या महिला खेळाडूला बनायचंय हार्दिक पांड्या सारखं! WPL लिलावात लागणार लाखोंची बोली

झारखंडच्या महिला खेळाडूला बनायचंय हार्दिक पांड्या सारखं! WPL लिलावात लागणार लाखोंची बोली

झारखंडच्या बोकारो येथील महिला क्रिकेटपटू खुशबूचे नाव WPL 2023 च्या लिलावात समाविष्ट करण्यात आले.

झारखंडच्या बोकारो येथील महिला क्रिकेटपटू खुशबूचे नाव WPL 2023 च्या लिलावात समाविष्ट करण्यात आले.

झारखंड येथील महिला क्रिकेटपटू खुशबूचे नाव WPL 2023 च्या लिलावात समाविष्ट करण्यात आले. भारतीय संघात खेळण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या खुशबूला महिला प्रीमिअर लीगमधील कोणता संघ खरेदी करेल हे पाहणं औसुक्याच ठरणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 12 फेब्रुवारी : भारतात लवकरच महिला प्रीमिअर लीग खेळवली जाणार असून त्याकरता सोमवारी 13 फेब्रुवारी रोजी लिलाव पारपडणार आहे. यात प्रतिभावान महिला खेळाडूंना आपल्या संघात सामील करून घेण्यासाठी प्रत्येक संघ खेळाडूंवर बोली लावणार आहे. यात झारखंडच्या बोकारो येथील महिला क्रिकेटपटू खुशबूचे नाव WPL 2023 च्या लिलावात समाविष्ट करण्यात आले. भारतीय संघात खेळण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या खुशबूला महिला प्रीमिअर लीगमधील कोणता संघ खरेदी करेल हे पाहणं औसुक्याच ठरणार आहे. झारखंड राज्यातील बोकारोच्या कुर्मिडीह येथील खुशबू या तरुण प्रतिभावान खेळाडूला लहानपणापासूनच क्रिकेटची ओढ होती. आज आपल्या मेहनतीच्या आणि क्षमतेच्या जोरावर खुशबूने क्रिकेट विश्वात आपले स्थान निर्माण केले आहे. खुशबू ही मध्यमवर्गीय कुटुंबातील असून तिने अनेक सामन्यांमध्ये झारखंड संघाचे प्रतिनिधित्वही केले. तिने झारखंड क्रिकेट संघ आणि BCCI द्वारे आयोजित स्पर्धांमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आहे.   हे ही वाचा  : Women T20 World Cup : आज भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला! कधी, कुठे पाहाल सामना? खुशबू ही भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याची मोठी चाहती आहे. खुशबू ही देखील एक अष्टपैलू खेळाडू असून ती उजव्या हाताची फलंदाजी  आणि मध्यम वेगवान गोलंदाज आहे. खुशबू हार्दिक पांड्याला तिचा आदर्श मानते. खुशबूने न्यूज एटिनशी संवाद साधताला. यावेळी बोलताना ती म्हणाली, “WPL लिलावासाठी मी खूप उत्सुक आहे. आपल्यासारख्या नवख्या टॅलेंटला आपली प्रतिभा दाखवण्याची संधी या स्पर्धेतून मिळेल” अशा भावना तिने व्यक्त केल्या. तसेच “आपल्याला भविष्यात भारतीय संघासाठी खेळायचे आहे तेव्हा डब्ल्यूपीएल सामन्यांमध्ये ही आपण सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे”, खुशबूने सांगितले. WPL 2023 लिलावात खुशबूची मूळ किंमत 10 लाख असणार आहे.

News18लोकमत
News18लोकमत

4 मार्चपासून सुरु होणार WPL 2023 : 4 मार्चपासून महिला प्रीमिअर लीग स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 5 संघांचा समावेश असून प्रत्येक संघात सर्वाधिक 18 खेळाडूंचा समावेश असेल.  प्रत्येक संघाचे बजेट 12 कोटी ठेवण्यात आले असून WPL 2023 चे सर्व सामने मुंबईत खेळवले जाणार आहेत. WPL 2023 लिलावाचे थेट प्रसारण VIACOM 18 च्या नेटवर्कवर दुपारी 2:00 वाजेपासून सुरु होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात